जिम ट्रेनर तरुणीचा भयानक कट, प्रोटीनच्या दुकानाबाहेर खेळ खल्लास; रक्ताचे ओघळ बघून पुणेकर हादरले
- Published by:Prachi Amale
- Reported by:Govind Wakde
Last Updated:
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका प्रोटीन पदार्थ विक्रीच्या दुकानांमध्ये या तरुणाचा लोखंडी रॉड डोक्यात घालून खून करण्यात आले आहे.
पुणे : उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिम ट्रेनर असलेल्या तरूणीने एका व्यक्तीचा खून केला आहे. तरूणीला व्यक्ती त्रास देत असल्याने हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोपीनाथ उर्फ लल्ला वर्पे अस खून करण्यात आलेल्या 35 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, प्रांजल तावरे असे 22 वर्षीय जिम ट्रेनर तरुणीचे नाव आहे. आरोपी तरुणीने तिच्या मित्रासोबत दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका प्रोटीन पदार्थ विक्रीच्या दुकानांमध्ये या तरुणाचा लोखंडी रॉड डोक्यात घालून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी तरुणीचा मित्र यश पाटोळे आणि तरुणीवर मयत गोपीनाथची खून केल्याप्रकरणी दिघी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
रक्ताचे ओघळ बाहेर आल्याने घटना उघडकीस
खून केल्यानंतर जिम ट्रेनर तरुणी आरोपी तरुणी आणि तिचा मित्र दिघी पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत गोपीनाथ हा तरुणीला त्रास देत असायचा त्यामुळे त्याची तिने व तिच्या मित्राने मिळून हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. खून केल्यानंतर दुकानाचे शेटर बंद करून दोन्ही आरोपी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. रक्ताचे ओघळ बाहेर आल्याने घटना उघडकीस आली आहे.
advertisement
जमिनीच्या वादातून पती-पत्नीचा भर चौकात निर्घृण खून
तुळजापूर-सोलापूर हायवेवरील करजखेडा गावात आज दुपारी जमिनीच्या वादातून पती-पत्नीचा भर चौकात निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. सहदेव पवार व प्रियांका पवार असे मयत दाम्पत्याचे नाव असून, त्यांची बाप-लेकाने मिळून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या जमिनीच्या बांधाच्या वादातून आरोपींनी पती-पत्नीला प्रथम गाडीने जोरदार धडक दिली. त्यानंतर कोयत्याने वार करून दोघांचा जागीच मृत्यू घडवून आणला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 13, 2025 7:49 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
जिम ट्रेनर तरुणीचा भयानक कट, प्रोटीनच्या दुकानाबाहेर खेळ खल्लास; रक्ताचे ओघळ बघून पुणेकर हादरले


