दरवाजा-खिडकीच्या काचा फुटल्या, घरातील फटाक्यांनाही आग, सिलेंडरच्या स्फोटानं हादरलं लोणी काळभोर
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
लोणी काळभोर येथून एक अतिशय धक्कादायक आणि अजब घटना समोर आली आहे. परिसरात सोमवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे
पुणे : लोणी काळभोर येथून एक अतिशय धक्कादायक आणि अजब घटना समोर आली आहे. परिसरात सोमवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. लोणी काळभोर येथील नेहरू चौकाजवळील जगताप हाईट्स इमारतीमधील एका घरात गॅस सिलिंडरमधून गळती होऊन अचानक मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत घरातील महिला गंभीर भाजून जखमी झाली, तर स्फोटाच्या तीव्रतेमुळे घराची खिडकी लोखंडी ग्रीलसह तुटून रस्त्यावर पडली. यात रस्त्यावर दुचाकीवरून जात असलेला एक तरुणही गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या मजल्यावरील सदनिकेत राहणाऱ्या करुणा मनोज जगताप या स्फोटात होरपळून गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी झालेल्या तरुणाचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेनंतर तातडीने दोघांनाही लोणी काळभोर येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
घटनेच्या वेळी करुणा जगताप यांचे पती कामासाठी बाहेर गेले होते, तर मुलं शाळेत गेली होती. घरात त्या एकट्याच होत्या. घरात दोन गॅस टाक्या आणि गॅस गिझरही आहे. सोमवारी सकाळी गॅस गळती झाली आणि मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे दिवाळीत घरात शिल्लक असलेले फटाकेही मोठ्या आवाजात वाजू लागले. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, घराचे दार, खिडक्या आणि काचा फुटून त्यांचा मोठा खच थेट खाली रस्त्यावर पडला. याच वेळी दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणाच्या अंगावर काचा आणि ग्रीलचे अवशेष पडल्याने तो जखमी झाला. लोणी काळभोर पोलीस या घटनेची नोंद घेऊन तपास करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 03, 2025 11:13 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
दरवाजा-खिडकीच्या काचा फुटल्या, घरातील फटाक्यांनाही आग, सिलेंडरच्या स्फोटानं हादरलं लोणी काळभोर


