Maharashtra Elections 2024 : ठाकरे गटाला धक्का, फुटीनंतर साथ देणाऱ्या पक्षाने युती तोडली, स्वतंत्र लढणार!

Last Updated:

Maharashtra Assembly Elections 2024 : जागा वाटपाच्या मुद्यावरूनलहान पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत असलेली युती तोडण्याची घोषणा संभाजी ब्रिगेडने केली आहे.

ठाकरे गटाला धक्का, पक्ष फुटीनंतर साथ देणाऱ्या पक्षाने युती तोडली, स्वतंत्र उमेदवार उभे करणार
ठाकरे गटाला धक्का, पक्ष फुटीनंतर साथ देणाऱ्या पक्षाने युती तोडली, स्वतंत्र उमेदवार उभे करणार
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. जागा वाटपाच्या मुद्यावरूनलहान पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत असलेली युती तोडण्याची घोषणा संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज साखरे यांनी पुण्यात ही घोषणा केली आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर संभाजी ब्रिगेडने शिवसेना ठाकरे गटासोबत युती केली होती. जवळपास दोन ते अडीच वर्षही युती होती. मात्र, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता संभाजी ब्रिगेडने ही युती तोडत असल्याची घोषणा केली आहे. विधानसभा जागा वाटपाच्या मुद्यावर ही युती तुटत असल्याचे मनोज साखरे यांनी ही घोषणा केली.

संभाजी ब्रिगेडने काय म्हटले?

advertisement
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटासोबत असणारी गेले दोन ते अडीच वर्षाची युती तोडणार असल्याची घोषणा आज पुण्यात संभाजी ब्रिगेड कडून करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला योग्य मान मिळाला नसल्याचा आरोप मनोज आखरे यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत आम्हाला 5 ते 6 जागा देणार असल्याचे या आधी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होते. मात्र आम्हाला आता एकही जागा दिली जात नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे साखरे यांनी सांगितले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड स्वतंत्रपणे 50 जागा लढणार असल्याची घोषणा मनोज आखरे यांनी केली.
advertisement

मविआचे जागा वाटप निश्चित नाही...

महाविकास आघाडीत अजूनही जागा वाटप जाहीर झाले नाही. बुधवारी, 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत पत्रकार परिषदेत जागा वाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची जागा वाटप चर्चा लांबल्याने आघाडीतील इतर लहान घटक पक्षही नाराज आहेत. शेतकरी कामगार पक्षाने आपल्या 6 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये ठाकरे गट दावा करत असलेल्या सांगोल्याच्या जागेचा समावेश आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Maharashtra Elections 2024 : ठाकरे गटाला धक्का, फुटीनंतर साथ देणाऱ्या पक्षाने युती तोडली, स्वतंत्र लढणार!
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement