MHADA Lottery : पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'या' मोक्याच्या ठिकाणी म्हाडाची बंपर लॉटरी; हक्काच्या घरासाठी आजच अर्ज करा

Last Updated:

Pune MHADA Lottery 2025 : पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरात म्हाडाच्या 269 घरांची विक्री सुरू. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध असलेली ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर दिली जात आहेत.

News18
News18
पुणे : पुण्यात आपले स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून नवीन घरांच्या विक्रीची घोषणा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तळेगाव दाभाडे येथे ही घरे उपलब्ध झाली आहेत. अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी एकूण 269 घरे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिली जाणार आहेत. जाहिरात 10 ऑक्टोबर 2025 पासून प्रसिद्ध करण्यात आली असून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
एकूण 269 घरांपैकी वाटप असे केले आहे
अनुसूचित जातीसाठी 29, अनुसूचित जमातीसाठी 29, भटक्या जमातीसाठी 5, विमुक्त जातीसाठी 6, आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 200 घरे उपलब्ध आहेत.
घराचे क्षेत्रफळ आणि किंमत
या घरांचे एकूण क्षेत्रफळ 48.96 चौ. मी. असून तर चटई क्षेत्रफळ 30.67 चौ. मी. आहे. घराची मूळ किंमत 20,46,882 रुपये इतकी आहे केंद्र शासनाकडून 1,50,000 आणि राज्य शासनाकडून 1,00,000 अनुदान मिळाल्यानंतर अर्जदारास 17,96,882 भरणे राहते. त्यासोबत भुईभाडे, कर आणि इतर आकार 18,625 असून, एकूण रक्कम 18,15,507 इतकी आहे.
advertisement
अर्ज विक्री वेळापत्रक
अर्ज प्रक्रिया 10 ऑक्टोबर 2025 पासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार असून वेळ ही सकाळी 11 ते सायंकाळी 5 असेल. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे सुट्टीचे दिवस वगळले आहेत. अर्ज पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ, गृह निर्माण भवन, आगरकर रोड, पुणे येथे भरता येईल. महत्त्वाचे म्हणजे या अर्जाची किंमत 600 रुपये  आणि त्या 108 रुपये जीएसटी असेल. तर अर्जासोबत भरावयाची रक्कम 1,79,688 इतकी आहे.
advertisement
पात्रतेच्या अटी
1)अर्जदार भारतीय नागरिक असावा.
2)अर्जदाराचे आणि त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावे.
3)अर्जदारांच्या कुटुंबाच्या नावावर भारतामध्ये कुठेही पक्के घर नसावे.
4)अर्जदाराने प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक तीनमध्ये नोंदणी केलेली असावी.
ही संधी अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घर मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी लवकरात लवकर अर्ज भरून आपले स्वप्नातील घर वास्तवात आणावे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
MHADA Lottery : पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'या' मोक्याच्या ठिकाणी म्हाडाची बंपर लॉटरी; हक्काच्या घरासाठी आजच अर्ज करा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement