Vastu Tips Diwali: दिवाळीआधीच दुरुस्त करून घ्या घरातील 5 वास्तुदोष, देवी लक्ष्मी आनंदानं करेल गृहप्रवेश

Last Updated:

Vastu Tips Diwali: दिवाळीपूर्वी घराची साफसफाई केली जाते आणि घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी विविध वास्तु टिप्स वापरल्या जातात. दिवाळी आधी घरातील काही गोष्टी योग्य ठिकाणी ठेवल्यास लवकरच शुभ परिणाम दिसू लागतात.

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मातील मोठ्या सणांपैकी दिवाळी हा एक आहे, दिवाळीची तयारी काही दिवस आधीच सुरू होते. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीपूर्वी घराची साफसफाई केली जाते आणि घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी विविध वास्तु टिप्स वापरल्या जातात. दिवाळी आधी घरातील काही गोष्टी योग्य ठिकाणी ठेवल्यास लवकरच शुभ परिणाम दिसू लागतात. दिवाळीत माता लक्ष्मी हसतमुख चेहऱ्यानं प्रवेश करते, त्याविषयी जाणून घेऊ.
लाफिंग बुद्धा - दिवाळीच्या वेळी घरात लाफिंग बुद्धा आणल्यास घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. तुम्ही दिवाळीला लाफिंग बुद्धा घरात आणत असाल, तर त्याला मुख्य दरवाजाच्या समोर, घराच्या आतल्या बाजूला तोंड करून ठेवा. याव्यतिरिक्त, त्याला पूर्व दिशा किंवा ईशान्य दिशेला (उत्तर-पूर्व) ठेवू शकता. घराव्यतिरिक्त, लाफिंग बुद्धाला ऑफिसच्या डेस्कवर देखील ठेवणे चांगले मानले जाते.
advertisement
तुळशीचे रोप - दिवाळीच्या काळात घरात तुळशीचे रोप लावून त्याची पूजा केल्यास सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट होते. यामुळे माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होऊन तिची कृपा तुमच्यावर करेल. वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप घराच्या ईशान्य कोपऱ्यात (उत्तर-पूर्व) ठेवावे. या दिशेमध्ये लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
श्रीफळ (नारळ) खरेदी करणे शुभ - दिवाळीपूर्वी घरात नारळ खरेदी करून आणल्यास समजावे की, माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न झाली आहे. माता लक्ष्मीला नारळ अतिशय प्रिय आहे, नारळ पूजाघरात ठेवल्यास घरात सकारात्मकता वाढते.
advertisement
कासव घरात आणेल समृद्धी - वास्तुशास्त्रानुसार, दिवाळीला धातूचे (Metal) कासव घरात आणल्यास घरात सकारात्मक ऊर्जा तर येईलच, पण घरात शांतता, सुख आणि समृद्धी देखील येईल. धातूचे कासव उत्तर दिशेला आणि क्रिस्टलचे कासव ईशान्य दिशेला (उत्तर-पूर्व) ठेवावे. याव्यतिरिक्त, पूर्व दिशेला किंवा मुख्य दरवाजावर घराच्या आतल्या बाजूला तोंड करून ठेवणे देखील शुभ आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips Diwali: दिवाळीआधीच दुरुस्त करून घ्या घरातील 5 वास्तुदोष, देवी लक्ष्मी आनंदानं करेल गृहप्रवेश
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement