MHADA Pune : पुण्यात स्वस्तात घरं घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, 4186 घरांची लॉटरी; म्हाडाची नवी घोषणा
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे म्हाडाचा घटक पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 4,186 सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी दि. 30 नोव्हेंबर, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
4,186 सदनिकांसाठी आतापर्यंत 1,82,781 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1,33,885 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. मंडळातर्फे सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत दि. 11 डिसेंबर, 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता काढण्यात येणार आहे. दिनांक 30 नोव्हेंबर, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदार ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करू शकणार आहेत. दिनांक 01 डिसेंबर, 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.
advertisement
काही तांत्रिक कारणांमुळे बऱ्याच अर्जदारांची कागदपत्रे पडताळणीसाठी अडचणी आल्याने व अनेक नागरिकांकडून कागदपत्रांची पुर्तता करणेसाठी तसेच इतर कारणांस्तव अर्ज करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदतवाढ मिळण्याविषयी मागणी करण्यात आली. नागरिकांची मागणी व सोडतीसाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता शेवटची संधी म्हणून दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. सोडतीसाठीचे नवीन वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. इतर मजकुर पुर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीप्रमाणे राहील, असे पुणे मंडळाच्या अधिकार्यांनी सांगितले.
advertisement
पुणे मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत चार घटकांमध्ये विभागण्यात आली असून यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 1663 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 299 सदनिका, 15 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील 884 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण 3222 सदनिकांचा समावेश आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 20, 2025 8:49 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
MHADA Pune : पुण्यात स्वस्तात घरं घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, 4186 घरांची लॉटरी; म्हाडाची नवी घोषणा


