असाही एक वाढदिवस! 50 शी निमित्ताने सर केले 50 गडकिल्ले, मिलिंद यांच्या जिद्दीची कहाणी
- Reported by:Niranjan Sherkar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
वाढदिवसाला केक कापून आणि जल्लोष करून अनेक जण आपला वाढदिवस वेगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करतात. मात्र पुण्यातील मिलिंद सोनवणे यांनी 50 वा वाढदिवस 50 गडकिल्ले सर करून अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.
पुणे : वाढदिवसाला केक कापून आणि जल्लोष करून अनेक जण आपला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. मात्र पुण्यातील मिलिंद सोनवणे यांनी 50 वा वाढदिवस 50 गडकिल्ले सर करून अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. ह्याबद्दल अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना मिलिंद सोनवणे यांनी दिली.
सामान्य कुटुंबातून आलेले मिलिंद सोनवणे हे पेशाने व्यावसायिक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गिर्यारोहण, ट्रेकिंग आणि किल्ले संवर्धनाच्या चळवळीत ते सक्रिय आहेत. निसर्गप्रेम, इतिहासाची ओढ या गोष्टींचा संगम साधत त्यांनी वाढदिवसानिमित्त 50 गड किल्ले सर केले. 9 जानेवारी 2025 रोजी त्यांनी किल्ले शिवनेरी पासून त्यांनी सुरुवात केली, तर 9 नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील धोडप किल्ला सर करून ह्या संकल्पनेचा शेवट केला.
advertisement
मिलिंद सोनवणे यांनी सर केलेले 50 गड केवळ गिर्यारोहणाचे टार्गेट नव्हते, तर इतिहासाशी जोडणारी एक संकल्पना होती. या मोहिमेत त्यांनी जिल्ह्यातील भोर, मावळ, जुन्नर सोबतच नाशिक आणि सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेले किल्ले सर केले. पाऊस, उन्ह, घनदाट जंगल आणि थरारक चढाई अशा आव्हानांना सामोरे जात त्यांनी ही संकल्पना पूर्णत्वास नेली.
advertisement
मिलिंद सोनवणे यांनी सांगितले की, सुरुवातीला घरातून किरकोळ विरोध झाला. 17 वर्षांपूर्वी फुटबॉल खेळताना पायाला झालेले दुखापत आणि त्यामुळे करावी लागलेली शस्त्रक्रिया या गोष्टीमुळे घरातून विरोध झाला. मात्र ध्यास आणि मित्रांची भक्कम साथ यामुळे हे शक्य झाले. पत्नी, मुलगी, मुलगा आणि प्रशिक्षक ज्ञानेश्वर येनपुरे यांच्यामुळे 50 किल्ले सर करण्याचा मानस पूर्ण झाला.
advertisement
आज अनेक तरुण मोबाईल, सोशल मीडिया यात अडकलेले असताना त्यांनी प्रत्यक्ष निसर्गात उतरून इतिहासाच्या पाऊलखुणांवर चालत, वयाच्या पन्नासाव्या वर्षी 50 गडकिल्ले सर करत तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 28, 2025 6:35 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
असाही एक वाढदिवस! 50 शी निमित्ताने सर केले 50 गडकिल्ले, मिलिंद यांच्या जिद्दीची कहाणी






