Supriya Sule : 'मी पुन्हा सांगते राष्ट्रवादीत फूट..' सुप्रिया सुळे यांनी 'त्या' चर्चांना दिला पूर्ण विराम

Last Updated:

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे बोलताना पुन्हा एकदा पक्ष फुटीवर वक्तव्य केलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे
वैभव सोनवणे, प्रतिनिधी
पुणे, 25 ऑगस्ट : अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. मात्र, आमच्या पक्षात फूट पडली नसल्याची वक्तव्ये शरद पवार गटाकडून केली गेल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याचा पुनरउच्चार केला आहे.
advertisement
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादीत फूट पडली की नाही, अजित पवार यांची वेगळी भूमिका मान्य आहे, का असे सवाल सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मी पुन्हा एकदा सांगते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही. पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील हे अध्यक्ष आहे. मी आधी जे बोलले त्यावर मी ठाम आहे. पक्षातील 9 आमदार आणि दोन खासदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे इतकेच. त्यांना नोटीस पाठवलेली आहे.
advertisement
आघाडीतही संभ्रम नाही : सुळे
पुढे बोलताना सुळे, म्हणाल्या, माझे आणि संजय राऊत यांचे बोलणं झालं आहे. आम्ही संभ्रम निर्माण करतोय असं मला ते म्हणाले नाहीत. पक्षांमध्ये वेगळी भूमिका घेणाऱ्याना निलंबित करण्याबाबत पत्र आम्ही विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहे. मी दादांबरोवर गुप्त बैठका केलेल्या नाहीत. भावाला भेटायला गुप्तता बाळगण्याचे कारणच काय. आम्ही पारदर्शी पणे काम करतो. अजित पवारांना परत घेणार का? याविषयी बोलण्या इतपत मी मोठी नाही. शरद पवार साहेब सकाळी बोलले, तो त्यांचाच अधिकार आहे. ते आमचे सर्वोच्च नेते आहेत आमचे बॉस आहेत आणि बॉस इज ऑलवेज राईट.
advertisement
मी बावनकुळे यांचे आभार मानते. 303 खासदार आणि 105 आमदार त्यांच्याकडे आहेत. तरीदेखील त्यांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्यांच्याकडे यावेसे वाटतात. याचा अर्थ शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये कुछ तो खास बात है. उद्या बारामती मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागरी सत्कार होतोय याविषयी मला काही माहिती नाही.
advertisement
केंद्र तसेच राज्य सरकारमध्ये धोरण लकवा : सुळे
अजितदादा मुख्यमंत्री होतील की नाही हे मला माहिती नाही. मला गॉसिप करायला वेळ नाही. मला कांदा टोमॅटो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यात मी व्यस्त असते. केंद्र तसेच राज्य सरकारमध्ये धोरण लकवा आहे. कांद्याच्या विषयावर राज्याचे कृषिमंत्री केंद्रीय मंत्र्यांना भेटायला गेले असताना ती भेट पूर्ण होण्याआधीच उपमुख्यमंत्री जपानमधून कांद्याविषयीचा निर्णय ट्विट करून घोषित करतात. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना काही माहिती नसते. अंधारात ठेवून निर्णय घेतले जातात जी घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे की उपमुख्यमंत्री जपानमधून करतात. कशाचा कशाला मेळ नाही. हा मुख्यमंत्र्यांचा देखील अपमान असल्याचा टोला सुळे यांनी लगावला.
मराठी बातम्या/पुणे/
Supriya Sule : 'मी पुन्हा सांगते राष्ट्रवादीत फूट..' सुप्रिया सुळे यांनी 'त्या' चर्चांना दिला पूर्ण विराम
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement