संधी मागितली तरी द्यायची नसते, शरद पवारांचं अजितदादांबद्दल आणखी एक नवीन विधान

Last Updated:

शरद पवार यांनी अजित पवारांबाबत आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलंय.

News18
News18
सातारा, 25 ऑगस्ट : शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नाही, पक्षातून एखादा मोठा गट बाहेर पडला तर पक्षात फूट पडली असं म्हणता येईल, मात्र राष्ट्रवादीमध्ये तशी स्थिती नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वतृळात चर्चेला उधाण आलं आहे. अखेर यावर आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रावादीमध्ये फुट पडली नाही, फक्त काही जणांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पक्षात फूट पडली असं म्हणता येणार नाही. मात्र जरी असं असलं तरी पुन्हा अजित पवार यांना संधी देणार नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
पहाटे शपथविधी झाला होता, त्याच्यामध्ये आमचे सहकारी सहभागी झाले होते. त्यानंतर आम्ही निर्णय घेतला होता. त्याच्यानंतर जे काही झालं ते योग्य काम झालं नाही, पुन्हा अशी भूमिका घेणार नाही, असं त्यांनी सांगितलं होतं.अशी भूमिका त्यांनी घेतली होती, त्यानंतर एक संधी म्हणून त्यांना संधी दिली होती, संधी सारखी मागायची नसते आणि संधी सारखी द्यायची नसते. आता आमची भूमिका दुसरी आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान शरद पवार यांनी अजित पवार यांना आमचे नेते म्हटल्याचं वृत्त प्रसारमाध्यमातून समोर येत आहे. यावर देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांना मी आमचे नेते म्हटलोच नाही. सुप्रिया सुळे अजित पवार यांना आमचे नेते असं म्हटल्या असतील. सुप्रिया सुळे या त्यांची धाकटी बहिण आहेत. बहिण भावाचे नाते आहे, त्यामुळे त्यांनी तसं म्हटलं असेल. त्या बोलल्या असतील तर त्याचा लगेच राजकीय अर्थ काढायची गरज नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
संधी मागितली तरी द्यायची नसते, शरद पवारांचं अजितदादांबद्दल आणखी एक नवीन विधान
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement