आता आगीच्या घटनांना लागणार ब्रेक! पिंपरी-चिंचवडमध्ये 150 कोटींचा मेगा प्लॅन तयार
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune News: पिंपरी-चिंचवड हे प्रमुख औद्योगिक शहर असून याठिकाणी अग्निशमनसाठी 150 कोटींचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. नेमका प्लॅन काय जाणून घेऊ.
पुणे: उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आगीच्या घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. पिंपरी येथे अत्याधुनिक अग्निशमन प्रशिक्षण अकादमी आणि निवासी संकुल उभारण्यास सुरुवात केली आहे. शहरातील अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन तयारी मजबूत करण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पासाठी 150 कोटी 91 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असून, हे काम 30 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड हे राज्यातील प्रमुख औद्योगिक शहर असून, गेल्या काही वर्षांत या शहराचा विकास वेगाने झाला आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून रोजगाराच्या शोधात मोठ्या प्रमाणावर नागरिक येथे स्थायिक झाले आहेत. वाढत्या लोकसंख्या आणि औद्योगिक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शहरातील अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन सेवांना बळकटी देण्यावर भर दिला जात आहे.
advertisement
पिंपरीत उभारले जाणारं 15 मजली संकुल
या अत्याधुनिक अग्निशमन प्रशिक्षण अकादमीत 22 अग्निशमन बंबांसाठी वाहनतळ, कर्मचाऱ्यांसाठी शयनगृह आणि स्वच्छतागृहे, तसेच 200 आसनांची प्रेक्षागृह व्यवस्था, स्वयंपाकघर आणि मुख्य अग्निशमन अधिकारी (CFO) यांचे केबिन असेल. यासोबतच 15 मजली निवासी संकुल उभारण्याचं कामही सुरू आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितलं की, अत्याधुनिक अग्निशमन प्रशिक्षण अकादमी आणि निवासी संकुल उभारण्याचं काम सुरू आहे. या माध्यमातून महापालिका शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी एकप्रकारे महत्त्वाची गुंतवणूक करत आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
view commentsLocation :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
October 26, 2025 9:52 AM IST


