पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्जाची होणार चौकशी, माजी आयुक्तांच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
- Published by:Sachin S
- Reported by:Govind Wakde
Last Updated:
आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त या दोघाची राज्य शासनाने बदली केली आहे. परंतु, बदलीनंतर देखील त्यांच्या कार्यकालातील कारभार चर्चेचा विषय ठरत आहे.
पिंपरी चिंचवड: नाशिक येथील कुंभमेळ्याचे आयुक्त म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आली त्या शेखर सिंह यांच्या पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा कार्यकाळातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे सिंह आणि त्यांचे तत्कालीन सहकारी असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या कार्यकाळात घेतल्या गेलेल्या कर्ज प्रकरणाची चौकशी करून शासनाच्या नगर विकास विभागाने पिंपरी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पत्र पाठवून तात्काळ चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच महापालिकेच्या कर्जाचा वस्तुस्थिती अहवाल देखील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची नाशिकमधील कुंभमेळा या ठिकाणी बदली आहे. तर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांची प्रतिनियुक्ती मूळ वित्त विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त या दोघाची राज्य शासनाने बदली केली आहे. परंतु, बदलीनंतर देखील त्यांच्या कार्यकालातील कारभार चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून या दोन्ही अधिका-यांबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषगाने चौकशी अहवाल मागिवला आहे. महापालिका प्रशासनाकडूनही अहवाल पाठविण्याची तयारी सुरू असून तत्कालीन आयुक्त सिंह आणि अतिरिक्त आयुक्त जांभळे या दोघांच्या कारभाराची शासनाकडून चौकशी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
महापालिकेतील प्रशासकीय राजवटीच्या कार्यकाळात चुकीच्या आणि भ्रष्ट कारभाराची तक्रार तत्कालीन आयुक्त सिंह आणि अतिरिक्त आयुक्त जांभळे यांच्या नावासह सनय छत्रपती शासन पक्षाचे अध्यक्ष नामदेवराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या तक्रारीची दखल राज्य शासनाने घेतली असून नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडे पत्राव्दारे संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने शासनास अहवाल पाठविण्यास कळवलं आहे.
advertisement
जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारीमध्ये मार्च 2022 पासून सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीचा गैरफायदा काही अधिकाऱ्यांनी घेतला आहे. आयुक्त सिंह आणि अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी मोठ्या प्रमाणावर महापालिका तिजोरीची लूट केली. ज्याप्रमाणे आपण वसई- विरार महापालिकेच्या माजी आयुक्तांच्या घरावर ईडीने छापे टाकून भ्रष्टाचारावर प्रहार केला. त्या प्रकारची कारवाई महापालिकेच्या आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बाबत करावी. या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ बडतर्फ करून आमच्या महापालिकेवर होणारे कर्ज थांबवावे, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली होती
view commentsLocation :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
November 22, 2025 5:59 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्जाची होणार चौकशी, माजी आयुक्तांच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार


