Pooja Khedkar case : पूजा खेडकर यांच्याकडून प्रतिज्ञापत्रात नवी माहिती, न्यायालयाकडे केली मोठी मागणी!
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
पूजा खेडकर यांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नवीन माहिती सादर केली आहे.
दिल्ली, प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी : बडतर्फ ट्रेनी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पूजा खेडकर यांच्यावर युपीएससीकडून देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या अपात्रतेला आव्हान दिलं आहे. पूजा खेडकर यांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नवीन माहिती सादर केली आहे.
१२ वेळा युपीएससी परीक्षा दिली असली तरी केवळ दिव्यांग कॅटगरीत दिलेली परीक्षा गृहीत धरावी अशी विनंती पूजा खेडकर यांनी कोर्टात केली आहे. शिवाय नाव आणि आडनावात बदल केला नसल्याचा दावाही पूजा खेडकर यांनी केला आहे.
पूजा खेडकर यांनी प्रतिज्ञापत्रात काय सांगितलं?
१. पूजा खेडकर यांनी एकूण १२ वेळा परीक्षा दिली आहे.
advertisement
२. त्यापैकी पाच वेळा दिव्यांग कॅटगरीतून परीक्षा दिली. त्यामुळे बाकीचे ७ वेळा दिलेल्या परीक्षा गृहीत धरू नये, अशी विनंती पूजा खेडकर यांनी दिल्ली हायकोर्टाकडे केली आहे.
३. मला सर्वच विभागांनी रितसर प्रमाणपत्र दिले आहेत.
४. नाव आणि आडनाव बदलले नाही. तर फक्त मधले नाव बदलले आहे. त्यामुळे नावात मोठा फेरफार केला यात तथ्य नाही. असं पूजा खेडकर यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
Aug 30, 2024 12:14 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pooja Khedkar case : पूजा खेडकर यांच्याकडून प्रतिज्ञापत्रात नवी माहिती, न्यायालयाकडे केली मोठी मागणी!










