pooja khedkar: बापाचे लाड अन् लेकीचं कांड, पूजा मॅडम गेल्या कुणीकडे?
- Published by:sachin Salve
Last Updated:
पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकर हिचा जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली पोलीस आता पूजाच्या शोधात लागले आहेत.
वैभव सोनवणे,प्रतिनिधी
पुणे: वादग्रस्त पुजा खेडकर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पटियाला हाऊस कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर ही फरार झाली. सुनावणी दरम्यान दिल्लीत ठाण मांडून बसलेली पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान दिल्ली पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर हिने 7 वेळा परिक्षा देताना स्वत:च्या वडिलांच्या किंवा आईच्या नावामध्ये बदल केलेला तपासात आढळून आला आहे.
advertisement
पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकर हिचा जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली पोलीस आता पूजाच्या शोधात लागले आहेत. दिल्ली पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यापासून पूजा खेडकर गायब आहे. तिने पुणे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीचा जबाब देण्यासाठी ही ती अटक होईल या भीतीने आलेली नव्हती. सुनावणी दरम्यान ती दिल्लीतच असल्याच दिल्ली पोलिसांच्या तपासात लक्षात आलं होतं मात्र तिचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती दुबईला पळून गेली असल्याची शक्यता दिल्ली पोलिसांना वाटत आहे. त्यानुसार, दिल्ली पोलिसांनी तपास ही सुरू केला.
advertisement
पटियाला हाऊस कोर्टाने जामीन फेटाळताना नमूद केलेले निरीक्षण ही महत्वाचे आहेत. केवळ पूजा खेडकरच नाही तर अशा पध्दतीने खोटी कागदपत्र सादर करून नियुक्ती मिळालेल्या अधिकाऱ्यांची ही चौकशी करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेत. अटकपूर्व जामीनाच्या सुनावणीदरम्यान कोर्टात काही महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. त्यात पूजा खेडेकर हिने सात वेळा स्वत:चं आईचं किंवा वडिलांचे नाव बदलून परिक्षा दिली. अटेमप्ट वाढवून मिळण्यासाठी तिने हा उद्योग केला असल्याच तपासात समोर आलंय.
advertisement
पूजा खेडकरचे सगळे प्रताप पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. दृष्ठी अधू, कमी बुध्यांक, बहु विकलांग अशा वेगवेगळ्या कोट्यांचा आधार घेऊन पूजाने परिक्षा दिल्यात. कायद्याच्या त्रुटीचा गैरफायदा घेतल्याच न्यायालयाने आदेशात म्हटलंय. त्यामुळे आता अटक टाळता येणं अशक्य असल्याचं लक्षात आल्याने पूजाने दुबईला पोबारा केला असल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त केली गेली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 02, 2024 6:35 PM IST










