Maharashtra Politics: दादांना आणखी एक धक्का बसणार?, पुण्यातील आमदार शरद पवारांच्या गळाला?
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
उपमुख्यमंत्री अजित पवारांना विधानसभेच्या तोंडावर अनेक धक्के बसत आहेत. त्यात आता पुण्यातील एक आमदार शरद पवारांसोबत व्यासपीठावर दिसल्याने चर्चांना उधाण आलं आहे....
पुणे: राष्ट्रवादीच्या गोटातून आता रोज नवनव्या आणि तितक्याच धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक आमदार, माजी आमदार आणि नेत्यांनी अजित पवारांच्या पक्षाला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी केली. आता पुण्यातून अशीच एक बातमी समोर येत आहे. हडपसरचे आमदार चेतन तुपे एका कार्यक्रमात शरद पवारांसोबत व्यासपीठावर दिसले. त्यामुळे चेतन तुपे देखील शरद पवारांसोबत जाण्याच्या विचारात आहेत का, असा सवाल निर्माण झाला आहे.
पुण्यातील कार्यक्रमात शरद पवार -तुपे एकत्र:
पुण्यातील हडपसरमध्ये सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने गोल्डन जुब्ली कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम हडपसर मतदार संघातील असल्याने स्थानिक आमदार म्हणून चेतन तुपे निमंत्रित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार देखील उपस्थित होते. शरद पवारांच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच चेतन तुपे पवारांसोबत व्यासपीठावर दिसले, त्यामुळे राजकीय चर्चांनी जोर धरला आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर चेतन तुपेंनी पवारांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र शरद पवार त्यांच्याकडेे न पाहता निघून गेले.
advertisement
चेतन तुपेंचं स्पष्टीकरण:
विधानसभेच्या तोंडावर चेतन तुपे पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाण्याचा विचार करत आहेत, का असा सवाल निर्माण झाला आहे. त्यावर आता चेतन तुपेंनी स्पष्टीकरण दिले आहे. " हा कार्यक्रम राजकीय नव्हता. त्यामुळे प्रोटोकॉल म्हणून मी या कार्यक्रमात उपस्थित होतो. राजकीय कार्यक्रम नसल्याने मी उपस्थित राहिलो. शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही.सातारा जिल्हा मित्रमंडळाचा स्नेहमेळावा असल्याने मी आलो. याच कार्यक्रमाच्या अध्यक्षाने मला निमंत्रण दिलं होतं. मी हडपसरचा आमदार या नात्याने या ठिकाणी उपस्थित राहिलो". असं तुपे म्हणाले.
advertisement
चेतन तुपेंच्या मनात घरवापसी?
view commentsकार्यक्रम संपल्यानंतर आमदार चेतन तुपेंनी शरद पवारांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शरद पवारांनी चेतन तुपेंकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कुठेतरी चेतन तुपे विधानसभा डोळ्यांसमोर ठेवत शरद पवारांसोबत जाण्याचा विचार करत आहेत का असा सवाल निर्माण झाला आहे. खरंतर ऐन विधानसभेच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. नुकताच माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे,
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 28, 2024 6:33 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Maharashtra Politics: दादांना आणखी एक धक्का बसणार?, पुण्यातील आमदार शरद पवारांच्या गळाला?


