Pune Accident : ब्रेक लावला अन् सळई अंगात घुसली...पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात, एकाचा मृत्यू
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Pune Accident News : अचानकपणे समोर आलेल्या वाहनाला वाचवण्यासाठी अचानक ब्रेक लावणे, हे ट्रक चालकाच्या जीवावर बेतले आहे.
अभिजीत पोटे, प्रतिनिधी, पुणे: अचानकपणे समोर आलेल्या वाहनाला वाचवण्यासाठी अचानक ब्रेक लावणे, हे ट्रक चालकाच्या जीवावर बेतले आहे. ट्रकच्या ट्ऱॉलीमध्ये असलेली लोखंडाची सळई अंगात घुसल्याने चालकाचा मृत्यू झाला. पुण्यातील चांदणी चौकात हा भीषण अपघात झाला. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
पुण्यातील चांदणी चौक परिसरात वाहतूक कोंडी, वाहतुकीचा प्रश्न कायमच ऐरणीवर असल्याचे चित्र आहे. त्यातच काही वेळेस अपघातसदृष्य स्थिती निर्माण होते. गुरुवारी झालेल्या विचित्र अपघाताने चांदणी चौकातील वाहतूक नियमनाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चांदणी चौकात आला असताना अचानक समोर एक वाहन आले. त्यामुळे चालकाने तातडीने ब्रेक दाबले. मात्र ट्रॉलीमध्ये भरलेली लोखंडी सळई जोरात पुढे सरकले. या लोखंडी सळई थेट केबिनमध्ये घुसले. यात चालक गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
पुण्यातील चांदणी चौकात काल रात्री आठच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. मृत चालक मूळचा राजस्थानचा असून, तो मुंबईहून बंगळुरूकडे ट्रक घेऊन जात होता. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघात इतका भयावह होता की ट्रकच्या केबिनचा समोरचा भाग चक्काचूर झाला होता. घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
advertisement
या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. चांदणी चौक हा आधीच वाहतूकदृष्ट्या गुंतागुंतीचा परिसर असल्याने या दुर्घटनेचा परिणाम संपूर्ण वाहतुकीवर जाणवला. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
June 13, 2025 7:58 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident : ब्रेक लावला अन् सळई अंगात घुसली...पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात, एकाचा मृत्यू


