Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! बोपदेव घाट पुढील 7 दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणते?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहर आणि पुरंदर तालुक्याला जोडणारा बोपदेव घाट आजपासुन पुढील सात दिवसांसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलाय.
पुणे: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.पुणे शहर आणि पुरंदर तालुक्याला जोडणारा बोपदेव घाट आजपासुन पुढील सात दिवसांसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाट रस्त्याच्या रुंदीकरणासह दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आलेत, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.14 जानेवारीपर्यंत हा मार्ग बंद राहणार असल्याने दररोज या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागणार आहे.
बोपदेव घाटातील रस्ता सध्या मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. याठिकाणी असणाऱ्या अरुंद रस्त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाट रस्त्याच्या रुंदीकरणासह दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.कामकाजाच्या काळात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच यंत्रसामग्रीच्या हालचाली सुरळीत राहाव्यात, यासाठी या कालावधीत एकेरी वाहतूकही सुरू न ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
advertisement
पर्यायी मार्ग कोणते?
घाट परिसरात होणाऱ्या कामामुळे प्रवाशांना होणारी अडचण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी मार्गांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सासवड तसेच पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांनी हडपसरमार्गे दिवे घाटाचा वापर करावा, तसेच, दक्षिणेकडील भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी नारायणपूरमार्गे चिव्हेवाडी घाटातून प्रवास पूर्ण करावा.या पर्यायी मार्गांमुळे निश्चित ठिकाणी जाण्यासाठी वेळ लागू शकतो. मात्र बोपदेव घाटातील सुरू असलेली कामे सुरळीत आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 14 जानेवारीनंतर काम पूर्ण झाल्यावर हा मार्ग पुन्हा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 8:12 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! बोपदेव घाट पुढील 7 दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणते?










