'कपडे लवकर इस्त्री करून द्या' ग्राहकाची मागणी ऐकताच दुकानदारानं कात्रीनं भोसकलं, आता घडली अद्दल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
"मला लग्नाला जायचे आहे, माझे कपडे लवकर इस्त्री करून द्या," अशी विनंती पिंगळे यांनी केली. मात्र, याच कारणावरून दुकानदार वसंतराव आणि पिंगळे यांच्यात वाद सुरू झाला.
पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात १३ वर्षांपूर्वी कपडे इस्त्री करण्याच्या किरकोळ कारणावरून ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी आता दोन भावांना राजगुरुनगर न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
नेमकी घटना काय?
ही घटना २० एप्रिल २०१३ रोजी चाकणमधील माणिक चौकात घडली होती. फिर्यादी हार्दिक भालचंद्र पिंगळे हे दुपारी १२ च्या सुमारास वसंतराव फुलावरे यांच्या इस्त्रीच्या दुकानात गेले होते. "मला लग्नाला जायचे आहे, माझे कपडे लवकर इस्त्री करून द्या," अशी विनंती पिंगळे यांनी केली. मात्र, याच कारणावरून दुकानदार वसंतराव आणि पिंगळे यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला.
advertisement
कात्रीने जीवघेणा हल्ला: वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. यावेळी वसंतराव यांची दोन मुले तेजस फुलावरे आणि सचिन उर्फ पप्पू फुलावरे यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी हार्दिक पिंगळे यांना अश्लील शिवीगाळ करत दुकानातील कात्रीने त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत पिंगळे गंभीर जखमी झाले होते. आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
advertisement
न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि साक्ष पुरावे ग्राह्य धरून तेजस आणि सचिन फुलावरे यांना दोषी ठरवले. त्यांना ३ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पुराव्याअभावी त्यांचे वडील वसंतराव फुलावरे यांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. किरकोळ वादातून केलेल्या हिंसेसाठी न्यायालयाने दिलेली ही शिक्षा समाजात शिस्त लावण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 10:52 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'कपडे लवकर इस्त्री करून द्या' ग्राहकाची मागणी ऐकताच दुकानदारानं कात्रीनं भोसकलं, आता घडली अद्दल










