Pune : पुण्यात राहून पाकिस्तानवर प्रेम, भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या खादिजा शेखला अटक
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला असतानाच पाकिस्तान जिंदाबाद असं स्टेटस ठेवणं पुण्याच्या तरुणीला महागात पडलं आहे.
वैभव सोनवणे, प्रतिनिधी
पुणे : भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला असतानाच पाकिस्तान जिंदाबाद असं स्टेटस ठेवणं पुण्याच्या तरुणीला महागात पडलं आहे. सिंहगड कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या आणि कोंढवा परिसरात राहणाऱ्या खादिजा शेख हिच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर खादिजा शेख हिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. खादिजा शेख हिच्याविरोधात बीएनएसच्या 152, 196, 197, 299, 302 आणि 353 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. खादिजा शेखने तिच्या स्टेटसमध्ये पाकिस्तान जिंदाबादसोबतच भारताविरोधातही गरळ ओकली आहे. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असल्याचे कोणतेही पुरावे न देता भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याचं खादिजा शेखने तिच्या स्टेटसमध्ये म्हणलं.
advertisement
सकल हिंदू समाज या एक्स हॅण्डलवरून खादिजा शेख आणि तिच्या स्टेटसचे फोटो शेअर केले गेले होते. यानंतर भाजप कार्यकर्त्या सुनैना होले यांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी खादिजा शेखविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली.
भिवंडीमध्येही कारवाई
दरम्यान भिवंडीमध्येही पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या 18 वर्षांच्या तरुणाला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. भिवंडी शहरातील घुंगट नगर परिसरात राहणाऱ्या अफसर अली अजगर अली शेख या 18 वर्षांच्या तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम आयडीवर स्टेटस म्हणून पाकिस्तानला सपोर्ट केल्यामुळे या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं.
advertisement
A girl studying at Sinhgad Institute in #Pune is a supporter of Pakistan!
Khadija Sheikh, a resident of #Kondhwa, has posted a story on Instagram showing her support for #Pakistan.
She travelled to #Kashmir last week. Could she have links with a T€rr0r!st group's? @NIA_India… pic.twitter.com/LNtfVODIGp
— सकल हिंदू समाज (@sakal_hindu_) May 9, 2025
advertisement
या तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम स्टेटसवर 'चाहे जो हो जाये सपोर्ट तो बस पाकिस्तान को करेंग' असं लिहिलं होतं. तरुणाच्या या स्टेटसवरून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या तरुणाच्या विरोधात बीएनएस कलम 152 अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
May 09, 2025 8:12 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : पुण्यात राहून पाकिस्तानवर प्रेम, भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या खादिजा शेखला अटक










