Pune Crime : पुणे हादरलं! बहिणीचा पळून जाऊन आळंदीत प्रेमविवाह, संपातलेल्या मावसभावाचा दाजीवर कोयत्याने वार

Last Updated:

Pune Crime News : प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे घडलीय, कुडांई मेन्स पार्लरमध्ये हे थरार नाट्य घडले असून, दुकानाची तोडफोड करून दुकान मालकाच्या हातावर व पाठीवर लोखंडी कोयत्याने वार करण्यात आले आहेत.

Pune Crime Attack On couple Assaulted In Barbershop
Pune Crime Attack On couple Assaulted In Barbershop
Pune Crime News : प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे घडली आहे. दत्तात्रय हौशीराम वाघ (वय 22) या तरुणावर त्याच्या सलून दुकानातच हा प्राणघातक हल्ला झाला असून, तो गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्याचा थरार पाहणारे नागरिक आणि ग्रामस्थांनी पळून जाणाऱ्या दोन आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रय वाघ याला तात्काळ शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दत्तात्रयला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळी हाजी येथील तामकरवाडी येथे राहणारे दत्तात्रय वाघ हे त्यांची पत्नी स्नेहा हिच्यासोबत राहत आहेत. टाकळी हाजी येथे त्यांचे 'कुडांई मेन्स पार्लर' नावाचे सलून दुकान आहे. दोन महिन्यांपूर्वी दत्तात्रय आणि स्नेहा यांचा आळंदी येथे प्रेमविवाह झाला होता. मात्र, स्नेहाच्या नातेवाईकांना हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे स्नेहाचा मावसभाऊ रवींद्र गायकवाड आणि इतर नातेवाइकांनी दत्तात्रयला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. यासंदर्भात दत्तात्रयने यापूर्वीच पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
advertisement

लोखंडी कोयत्याने वार

आज दुपारी दत्तात्रय वाघ आपल्या सलूनमध्ये शटर बंद करून, आशुतोष भाकरे याचे केस कापत होते. त्याचवेळी अचानक दुकानाचे शटर उघडून जीवन रवींद्र गायकवाड, शारुख बाबू शेख (वय २६), आणि प्रशांत हनुमंत साठे (वय १९) हे तिघे दुकानात घुसले. त्यांनी येताच दुकानातील काचा फोडल्या आणि साहित्याची नासधूस करण्यास सुरुवात केली. यावेळी जीवन गायकवाड याने लोखंडी कोयत्याने दत्तात्रय वाघ याच्या डाव्या मनगटावर आणि पाठीवर गंभीर वार केले. दत्तात्रयला जीवे मारण्याची धमकी देऊन तिन्ही आरोपी मोटारसायकलवरून रांजणगावच्या दिशेने पळून निघाले.
advertisement

आरोपींना पाठलाग करुन पकडलं

मात्र, हा सर्व प्रकार पाहून टाकळी हाजी येथील गावकऱ्यांनी आणि नागरिकांनी तात्काळ या आरोपींचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करून दोघा अनोळखी आरोपींना पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. पकडलेल्या आरोपींना टाकळी हाजी पोलीस चौकीत आणण्यात आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांची नावे शारुख शेख आणि प्रशांत साठे अशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी जीवन गायकवाडच्या मदतीने दत्तात्रय वाघवर हल्ला केल्याची कबुली दिली.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुणे हादरलं! बहिणीचा पळून जाऊन आळंदीत प्रेमविवाह, संपातलेल्या मावसभावाचा दाजीवर कोयत्याने वार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement