Pune Crime : मुळशीत मर्डरचा नवा पॅटर्न! रिक्षाचालकाने पाठलाग करत काढला काटा, पुणे स्टेशनवरच्या CCTV मध्ये काय दिसलं?

Last Updated:

Pune ghotavde Murder Case : पुण्यातील सुभाषणगर येथील रहिवासी असलेले आशुतोष वैशंपायन 4 सप्टेंबर रोजी लखनऊहून पुणे स्टेशनवर आले होते. तिथे ते एका रिक्षातून सुभाषणगरकडे गेले अन्...

News18
News18
Pune Crime News : पुण्यात कर्ज फेडण्यासाठी एका रिक्षाचालकाने केलेल्या भीषण खुनाच्या गुन्ह्याने पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका हादरून गेला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सचिन जाधव (41) नावाच्या रिक्षाचालकाला अटक केली असून, त्याच्यावर 11 सप्टेंबर रोजी अशुतोष वैशंपायन या प्रवाशाचा निर्घृण खून करून दरोडा टाकल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सापळा रचून कसं आरोपीला अटक पकडलं? जाणून घ्या सविस्तार

बारमध्ये मद्यपान केलं अन्...

पुण्यातील सुभाषणगर येथील रहिवासी असलेले आशुतोष वैशंपायन 4 सप्टेंबर रोजी लखनऊहून पुणे स्टेशनवर आले होते. तिथे ते एका रिक्षातून सुभाषणगरकडे गेले, जिथे त्यांनी एका बारमध्ये मद्यपान केले आणि नंतर दुसरी रिक्षा पकडली. त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. रिक्षाचालक सचिन जाधव याने वैशंपायन यांच्याकडे मोठी रोकड असल्याचे पाहिले आणि त्यांचा जीव घेण्याचा कट रचला.
advertisement

लोखंडी वस्तूने मारलं, गळा चिरून हत्या

11 सप्टेंबर रोजी जाधवने वैशंपायन यांना घोटवडे गावात नेलं. तिथं त्याने लोखंडी वस्तूने त्यांना मारले आणि नंतर गळा चिरून त्यांची हत्या केली. मृतदेह घोटवडे गावात टाकून तो पळून गेला. खून केल्यानंतर जाधवने वैशंपायन यांचे डेबिट कार्ड वापरून पुढील काही दिवसांत 4.45 लाख रुपये काढून घेतले. हे पैसे त्याने आपल्या मिनी-ट्रकचे कर्ज फेडण्यासाठी वापरले.
advertisement

कुजलेला मृतदेह आढळला

घोटवडे येथे 11 सप्टेंबर रोजी एका मध्यमवयीन व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ मिळालेल्या आधार कार्डाच्या मदतीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. हा आधार कार्ड मुंबईतील पवई येथील पत्त्याचा होता, परंतु वैशंपायन यांचे कुटुंबीय पुण्यात होते. पुणे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचालक जाधवचा माग काढला.
advertisement

13 दरोड्याचे गुन्हे दाखल

दरम्यान, आरोपी जाधव हा धणकवडी येथील रहिवासी असून, त्याच्यावर यापूर्वीच 13 दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी अनेक सापळे रचून अखेर रिक्षाचालक जाधवच्या मुसक्या आवळल्या. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, न्यायालयाने त्याला 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : मुळशीत मर्डरचा नवा पॅटर्न! रिक्षाचालकाने पाठलाग करत काढला काटा, पुणे स्टेशनवरच्या CCTV मध्ये काय दिसलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement