पुण्यात EVM वर 15 मिनिटं उशिराची वेळ, कधी तिसरं तर कधी चौथं बटन दाबल्यावर घोटाळा? रोहित पवारांचा सनसनाटी आरोप!

Last Updated:

Pune Election EVM showed time delay : पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे 15 मिनिटे उशिराची दाखवली जातेय, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

Pune Election EVM showed time delay of 15 minutes
Pune Election EVM showed time delay of 15 minutes
Pune Election 2026 : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज निवडणूक पार पडत आहे. परवा दिवशी प्रचाराच्या तोफा थंडवल्यानंतर आता नागरिक घराबाहेर पडून मतदान करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. पुण्यातील पाच ठिकाणी तासाभरापासून एव्हीएम बंद पडल्याचा प्रकार समोर आला होता. अशातच आता EVM वरील वेळ सुमारे 15 मिनिटे उशिराची दाखवली जात असल्याचं समोर आलंय. तर काही ठिकाणी ईव्हीएमवर आवाज येतो पण लाईट लागत नाही, अशी टीका देखील होत असल्याचं दिसतंय. अशातच आता रोहित पवार यांनी मोठा आरोप केलाय.

आवाज येतो पण लाईट लागत नाही

पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे 15 मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत नाही. एकूणच हे सगळंच संशयास्पद आणि निवडणुकीबाबत अविश्वास निर्माण करणारं आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement

राज्याच्या वनमंत्र्यांचं नाव गायब

निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देऊन हा गोंधळ तातडीने दूर करावा आणि मतदान हे मुक्त आणि निर्भय वातावरणासह मत दिलेल्या उमेदवारांनाच ते गेलं पाहिजे, याची काळजी घ्यावी, असं रोहित पवार म्हणाले. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी मतदान करणारे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांचं नाव मतदार यादीतून गायब आहे तर त्यांच्या कुटुंबातील तिघांची नावे तीन वेगवेगळ्या केंद्रावर आहेत. राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्यांनाच त्यांचं मतदान कुठं आहे हे माहित नसेल तर सामान्य लोकांना हे कसं कळणार? असा सवाल देखील रोहित पवारांनी म्हटलं आहे.
advertisement

निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल

दरम्यान, केवळ सत्तेतील एका पक्षाच्या सोयीसाठी वॉर्ड/प्रभाग रचनेपासूनच याची सुरवात झाली असून मतदारांचे चेहरे आणि आडनाव बघून त्यांना सोयीच्या प्रभागात टाकण्यात आलं. गणेश नाईक साहेब हे सत्तेत असूनही भाजपच्या रणनीतीची शिकार झाले आहेत. संपूर्ण राज्यात हीच अवस्था असून याबाबत निवडणूक आयोगाला जबाबदारी झटकता येणार नाही, उत्तर द्यावं लागेल.., असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात EVM वर 15 मिनिटं उशिराची वेळ, कधी तिसरं तर कधी चौथं बटन दाबल्यावर घोटाळा? रोहित पवारांचा सनसनाटी आरोप!
Next Article
advertisement
BMC Election: ठाकरेंच्या शिवसैनिकाला तडीपारीची नोटीस, अरविंद सावंत पोलिसांना भिडले! वरळीत मध्यरात्री तणाव
शिवसैनिकाला तडीपारीची नोटीस, खासदार सावंत पोलिसांना भिडले! वरळीत मध्यरात्री
  • मतदानाच्या पूर्वरात्री पैसे वाटपाच्या मुद्यावरून काही भागात तणावाची स्थिती दिस

  • दुसरीकडे वरळीत तणावाची स्थिती निर्माण झाली.

  • ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला तडीपारीची नोटीस दिल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले.

View All
advertisement