आंदेकर-कोमकर गँगवॉर पेटलं! आयुषच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या काळेच्या भावावर गोळीबार, पुण्यात सूडनाट्य
- Published by:Prachi Amale
Last Updated:
कोमकर हत्याप्रकरणी अटक असलेल्या दत्ता काळेचा भाऊ गणेश काळेवर दिवसाढवळ्या गोळीबार करत कोंढव्यात हत्या करण्यात आली आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. नुकत्याच नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात १९ वर्षीय आयुष कोमकरची निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषवर गोळीबार केला होता. आता आयुष कोमकर हत्याप्रकरणी अटक असलेल्या दत्ता काळेचा भाऊ गणेश काळेवर दिवसाढवळ्या गोळीबार करत कोंढव्यात हत्या करण्यात आली आहे.
advertisement
वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा असल्याने टोळीने सूड उगवला होता. ही घटना अद्याप ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा प्रकार घडला आहे.दिवसाढवळ्या कोंढवा परिसरात झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात गुन्हेगाराकडून गोळीबार करण्यात आला आहे.
पोलिसांचा फौजफाटा तैनात
advertisement
गणेश काळे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे. गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीने एकूण 4 गोळ्या झाडल्या त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले आहे. गणेश काळे याचा भाऊ दत्ता काळे हा आंदेकर टोळीतील नंबरकारी असून आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी होता. आयुष कोमकर हत्याप्रकरणी दत्ता काळे याला अटक करण्यात आली होती. घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली.
advertisement
पुण्यात गँगवॉर पुन्हा पेटंल का?
बंडू आंदेकर गट आणि कोमकर टोळीतील वैर मागील वर्षभरापासून पेटलेलं आहे. दरम्यान आयुषच्या हत्येनंतर आंदेकर टोळीतील एकावर हल्ला झाल्याने पुण्यात गँगवॉर पुन्हा पेटंल का असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र ही हत्या गँगवॉरमधून झालेली नाही, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कोमकर टोळीतील सदस्यांवर पाळत ठेवण्याचे काम हे दत्ता काळेवर सोपवण्यात आले होते.
advertisement
पुणे पोलिसांसाठी मोठे आव्हान
आयुष कोमकर हत्येप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरला तसेच आंदेकरांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना अटक केली आहे. मात्र तरी देखील ही हत्या होत असेल तर टोळ्या अजूनही सक्रिय असून पुणे पोलिसांसाठी हे मोठे आव्हान आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 01, 2025 4:39 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
आंदेकर-कोमकर गँगवॉर पेटलं! आयुषच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या काळेच्या भावावर गोळीबार, पुण्यात सूडनाट्य


