पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' महत्त्वाच्या चौकातील रस्त्यांवर खोदकाम, प्रवासाआधी तपासा पर्यायी मार्ग

Last Updated:

कामामुळे 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या दहा दिवसांच्या कालावधीसाठी हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.

महत्त्वाच्या चौकातील रस्त्यांवर खोदकाम (फाईल फोटो)
महत्त्वाच्या चौकातील रस्त्यांवर खोदकाम (फाईल फोटो)
पुणे : ‘पुणे ग्रँड चॅलेंज 2026’ स्पर्धेच्या तयारीचा भाग म्हणून पुणे महानगरपालिकेने (PMC) वानवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत महत्त्वाच्या रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. सोलापूर बाजार चौक ते गोळीबार चौक या दरम्यान आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार रस्ता खोदकाम आणि दुरुस्तीचं काम सुरू झालं आहे. या कामामुळे 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या दहा दिवसांच्या कालावधीसाठी हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.
प्रवेश बंदी आणि पर्यायी मार्ग
या रस्त्याच्या कामामुळे सोलापूर बाजार चौक ते गोळीबार मैदान चौकादरम्यान अवजड वाहने आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना (बस, ट्रक, टेम्पो) प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
PMPML बससाठी बदल: सोलापूर रस्त्याने पुलगेटहून पुणे रेल्वे स्थानक किंवा स्वारगेटला जाणाऱ्या पीएमपी बससाठी नवा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
advertisement
नवा मार्ग: पुलगेट - भैरोबा नाला चौक - वानवडी बाजार पोलिस चौकी - लुल्लानगर चौक - गंगाधाम चौक - आणि नंतर पुढे इच्छित स्थळ.
खासगी वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था: खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठीही सोयीचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
advertisement
पर्यायी मार्ग: भैरोबानाला चौकातून डावीकडे वळून - लुल्लानगरमार्गे इच्छित स्थळी जाता येईल. हा मार्ग खासगी वाहनांसाठी अधिक सोयीचा ठरू शकतो
हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि कामांच्या वेळेत अडथळा येऊ नये यासाठी घेण्यात आला आहे. हा तात्पुरता बदल वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे.  नागरिकांनी वाहतूक विभागाला सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' महत्त्वाच्या चौकातील रस्त्यांवर खोदकाम, प्रवासाआधी तपासा पर्यायी मार्ग
Next Article
advertisement
'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पुरावा काय? मोठी अपडेट
गौरीने वडिलांना फोटो पाठवले, कुटुंबावर आभाळ कोसळलं! मेसेजमध्ये होतं काय?
  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

View All
advertisement