Pune News: दुर्गंधीमुळे बंद केला 'तो' प्रकल्प; आता महापालिकेला 2 कोटी 81 लाखांचा भुर्दंड
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सूस येथील प्रकल्पातून येणाऱ्या दुर्गंधीचा परिसरातील नागरिकांना त्रास होतो, असं सांगत हा प्रकल्प बंद करण्याची मागणी करण्यात आली.
पुणे : ओल्या कचऱ्यापासून बायो सीएनजी तयार करण्याचा प्रकल्प सूस येथे सुरू होता. मात्र, सूस येथील प्रकल्पातून येणाऱ्या दुर्गंधीचा परिसरातील नागरिकांना त्रास होतो, असं सांगत हा प्रकल्प बंद करण्याची मागणी करण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी ही मागणी केल्यानंतर महापालिकेनं हा प्रकल्प बंदही केला. मात्र, आता हा प्रकल्प बंद केल्याने महापालिकेलाच मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे. महापालिकेला 2 कोटी 81 लाखांचा भुर्दंड भरावा लागणार आहे.
प्रकल्प चालवणाऱ्या ठेकेदाराला नुकसानभरपाईपोटी ही रक्कम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे जानेवारी 2024 ते जून 2025 दरम्यान प्रकल्प बंद ठेवण्यात आला. यादरम्यान जे काही नुकसान झालं त्याची भरपाई महपालिकेनं करावी, यासाठी ठेकेदार कंपनीने प्रशासनाला पत्र दिलं.
advertisement
या पत्रातून नुकसानभरपाई म्हणून सहा ते सात कोटी रुपयांची मागणी केली. यावर पालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमली आणि अखेर 2 कोटी 81 लाख रूपये इतकी रक्कम नुकसानभरपाई म्हणून देण्यास मंजुरी दिली. हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला गेला आणि समितीने मंजुरी दिली.
advertisement
प्रकल्प चालकांसोबत करारामध्ये आंदोलनामुळे प्रकल्प बंद राहिल्यास त्याबदल्यात महापालिका कुठलीही भरपाई देणार नाही, अशी अट असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय नुकसानभरपाई देण्याचं निविदेच्या करारात नमूद नसताना ठेकेदाराचं भलं केलं जात असल्याचा आरोपही केला जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 23, 2025 12:49 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: दुर्गंधीमुळे बंद केला 'तो' प्रकल्प; आता महापालिकेला 2 कोटी 81 लाखांचा भुर्दंड


