Pune : नववर्षात पुणेकरांना डबल गिफ्ट! दोन महत्त्वाच्या महामार्गांना अंतिम मंजुरी; कधी सुरु होणार काम?

Last Updated:

Pune Highway : पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी कमी होणार असून तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत महामार्ग प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.

News18
News18
पुणे : पुणे शहर आणि परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मार्फत पुणे जिल्ह्यात दोन मोठे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले असून यामध्ये तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग आणि हडपसर-यवत महामार्गाचा समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांना आता गती मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
सरकारने दोन महत्त्वाकांक्षी रस्त्यांना दिली मंजुरी
सध्या या प्रकल्पांबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून संबंधित प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहेत. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर पुढील महिनाभरात या दोन्ही महामार्गांच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन MSIDC कडून करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रस्ते प्रकल्पांचे कंत्राट नामांकित मोंटेकार्लो लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे.
advertisement
तळेगाव- चाकण-शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी असून या मार्गाची दुरुस्ती आणि सुधारणा दोन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. एकूण सुमारे 53.200 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असणार असूनयातील 24.200 किलोमीटरचा भाग उन्नत स्वरूपात विकसित केला जाणार आहे. उर्वरित मार्ग जमिनीच्या पातळीवर राहणार आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक पट्टा असलेल्या चाकण परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होणार असून वाहनचालकांचा वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होणार आहे.
advertisement
याशिवाय हडपसर-यवत या मार्गाचाही मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत सहा पदरी उन्नत महामार्ग उभारण्यात येणार असून सध्याच्या रस्त्याचेही सहा पदरीकरण केले जाणार आहे. परिणामी पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेषतहा अवजड वाहतूक, मालवाहतूक आणि दैनंदिन प्रवासी यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
हे दोन्ही महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प पुढील 2 ते 3 वर्षांच्या कालावधीत पूर्ण करून वाहनचालकांसाठी सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : नववर्षात पुणेकरांना डबल गिफ्ट! दोन महत्त्वाच्या महामार्गांना अंतिम मंजुरी; कधी सुरु होणार काम?
Next Article
advertisement
BMC Election : दहिसरमध्ये शिंदे गटाचा राडा! प्रचारात घरात घुसण्यावरून वाद, थेट लाथा-बुक्क्यांनी मारहाण, नेमकं काय घडलं!
दहिसरमध्ये शिंदे गटाचा राडा! प्रचारात घरात घुसण्यावरून वाद, थेट लाथा-बुक्क्यांनी
  • निवडणुकीच्या प्रचाराला हिंसक वळण लागल्याचे धक्कादायक चित्र दहिसरमध्ये पाहायला म

  • प्रचारादरम्यान, घरात शिरण्यास विरोध केल्याच्या कारणावरून कार्यकर्त्यांनी दोन व्

  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून,

View All
advertisement