Maha Shivratri 2026: हर-हर महादेव! यंदाच्या महाशिवरात्रीला राहिले फक्त इतके दिवस; विधी-शुभ मुहूर्त पाहा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Maha Shivratri 2026 Date: दृक पंचांगानुसार, यावर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी, रविवार रोजी संध्याकाळी 5 वाजून 04 मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी 16 फेब्रुवारी, सोमवार रोजी संध्याकाळी 5 वाजून 34 मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे महाशिवरात्री...
मुंबई : महाशिवरात्रीचा पवित्र सण दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास धरून भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो. त्यामुळे पहाटे ब्रह्ममुहूर्तापासूनच महादेवाच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. लोक आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, प्रगती मिळावी तसेच ग्रहदोष दूर व्हावेत, यासाठी रुद्राभिषेक करतात. जाणून घेऊया महाशिवरात्री कधी आहे, तिची अचूक तारीख, मुहूर्त आणि महत्त्व.
दृक पंचांगानुसार, यावर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी, रविवार रोजी संध्याकाळी 5 वाजून 04 मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी 16 फेब्रुवारी, सोमवार रोजी संध्याकाळी 5 वाजून 34 मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे महाशिवरात्री 15 फेब्रुवारी, रविवारी साजरी केली जाईल. याच दिवशी उपवास धरून भगवान शिवाची विधीवत पूजा केली जाईल.
advertisement
15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:21 ते 6:12 पर्यंत आहे. या वेळेत स्नान करून भगवान शिवाचा जलाभिषेक करणे शुभ मानले जाते. त्या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 12:59 असा आहे. तसेच निशिता मुहूर्त मध्यरात्री 12:11 पासून पहाटे 1:02 पर्यंत राहील.
महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून रात्रीपर्यंत जलाभिषेक केला जातो. मंदिरांमध्ये रात्रीपासूनच भक्तांच्या रांगा लागतात. मात्र शक्य असल्यास सकाळी किंवा प्रदोष काळात जलाभिषेक करणे अधिक फलदायी मानले जाते. शिवपूजेमध्ये चार प्रहरांच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे.
advertisement
यावर्षी महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. या योगात मनोभावे केलेली शिवपूजा नक्कीच फलदायी ठरते, असे मानले जाते. भगवान शंकराच्या कृपेने कामात यश मिळते. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 7:04 पासून संध्याकाळी 7:48 पर्यंत आहे. या दिवशी व्यतीपात योग पहाटेपासून 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:47 पर्यंत राहील, त्यानंतर वरीयान योग सुरू होईल. उत्तराषाढा नक्षत्र पहाटेपासून संध्याकाळी 7:48 पर्यंत असून त्यानंतर श्रवण नक्षत्र लागेल.
advertisement
महाशिवरात्रीच्या दिवशी शिववास पहाटेपासून संध्याकाळी 5:04 पर्यंत भोजनात राहील आणि त्यानंतर स्मशानात असेल. शिववास असताना रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते. मात्र महाशिवरात्रीला पूर्ण दिवस शिववास मानला जात असल्याने कोणत्याही वेळी रुद्राभिषेक करता येतो.
महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि शिवपूजा केल्याने अनेक संकटांपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक, रुद्राभिषेक, रुद्रपूजा, शिवसाधना केली जाते. शिवभक्तांसाठी हा दिवस फारच खास असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंत्रांचा जप केल्यास तो अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 1:17 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Maha Shivratri 2026: हर-हर महादेव! यंदाच्या महाशिवरात्रीला राहिले फक्त इतके दिवस; विधी-शुभ मुहूर्त पाहा










