Pune Mango: पुणेकरांसाठी गुड न्यूज! मार्केट यार्डात 'हापूस'ची एन्ट्री, डझनचा भाव किती?

Last Updated:

कर्नाटक येथील टंकूर भागातून हापूस आंब्याची पहिली आवक मार्केट यार्डातील फळबाजारात झाली आहे. त्यामुळे, आंब्याचा अधिकृत हंगाम सुरू होण्यापूर्वीच पुणेकरांना हापूसची चव चाखायला मिळणार आहे.

मार्केट यार्डात 'हापूस'ची एन्ट्री (प्रतिकात्मक फोटो)
मार्केट यार्डात 'हापूस'ची एन्ट्री (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: दरवर्षी पुण्याच्या मार्केट यार्डात रत्नागिरी किंवा देवगडच्या हापूसची पहिली पेटी दाखल होण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा या परंपरेला छेद देत कर्नाटकच्या हापूसने बाजी मारली आहे. कर्नाटक येथील टंकूर भागातून हापूस आंब्याची पहिली आवक मार्केट यार्डातील फळबाजारात झाली आहे. त्यामुळे, आंब्याचा अधिकृत हंगाम सुरू होण्यापूर्वीच पुणेकरांना हापूसची चव चाखायला मिळणार आहे.
लिलावात मोठी बोली: मार्केट यार्डातील प्रसिद्ध व्यापारी रोहन उरसळ यांच्या गाळ्यावर कर्नाटकचे शेतकरी जी. एम. शफीउल्ला यांच्या शेतातील हापूसच्या ६ पेट्या विक्रीसाठी आल्या होत्या. हंगामातील हा पहिलाच हापूस असल्याने खरेदीदारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. ४ डझनाच्या एका पेटीला लिलावात ५ हजार १०० रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला. हे आंबे व्यापारी सुरेश केवलाणी आणि बोनी रोहरा यांनी खरेदी केले. यावेळी सतीश उरसळ, आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
advertisement
यंदा हंगाम लवकर सुरू होणार?
दोन दिवसांपूर्वीच बाजारात 'लालबाग' जातीच्या आंब्याची आवक सुरू झाली होती. त्यानंतर आता हापूसचेही आगमन झाले आहे. गेल्या वर्षी हवामान बदलाचा मोठा फटका कर्नाटकच्या आंबा पिकाला बसला होता, त्यामुळे आवक घटली होती. मात्र, यंदा हवामान पोषक असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. दरवर्षी साधारणपणे एप्रिल महिन्यात आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होतो. परंतु यंदा तो मार्चमध्येच बहरात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून आवक हळूहळू वाढण्यास सुरुवात होईल.
advertisement
"पोषक हवामानामुळे यंदा कर्नाटक हापूसचे उत्पादन चांगले झाले असून आवकही वेळेआधी झाली आहे. फेब्रुवारीत आवक तुरळक असली तरी मार्चपासून ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध होतील," असे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Mango: पुणेकरांसाठी गुड न्यूज! मार्केट यार्डात 'हापूस'ची एन्ट्री, डझनचा भाव किती?
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement