दुचाकीची चेन साफ करताना अंगठाच तुटून खाली पडला; जोडण्यासाठी पुण्यातील डॉक्टरांचे 5 तास प्रयत्न, अन्...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
चेन स्वच्छ करत असताना अचानक त्यांचा हात फिरत्या चेनमध्ये ओढला गेला आणि प्रचंड वेगाने झालेल्या या अपघातात त्यांच्या हाताचा अंगठा शरीरापासून पूर्णपणे वेगळा होऊन खाली पडला.
पुणे : पुण्यातील वानवडी येथील इनामदार रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रातील कौशल्याचा प्रत्यय देणारी एक अत्यंत गुंतागुंतीची आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. घरच्या घरी दुचाकीची देखभाल करणे एका तरुणाच्या अंगाशी आले होते, परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्याचे कायमचे अपंगत्व टळले आहे. एका खाजगी शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले प्रमोद यादव (नाव बदललेले) आपल्या दुचाकीची चेन साफ करत होते. चेन स्वच्छ करत असताना अचानक त्यांचा हात फिरत्या चेनमध्ये ओढला गेला आणि प्रचंड वेगाने झालेल्या या अपघातात त्यांच्या हाताचा अंगठा शरीरापासून पूर्णपणे वेगळा होऊन खाली पडला. ही जखम इतकी गंभीर होती की केवळ त्वचा फाटली नव्हती, तर हाड आणि मऊ उतींसह अंगठा पूर्णपणे निखळला होता.
या अपघातानंतर राहुल यांना तातडीने प्राथमिक उपचारांसाठी जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी त्यांना सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडण्याची सुविधा असलेल्या मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. वेळ न घालवता त्यांना वानवडीच्या इनामदार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सुघटनशल्यचिकित्सक डॉ. अभिषेक घोष आणि त्यांच्या पथकाने 'मायक्रोव्हॅस्क्युलर थंब रिप्लांटेशन' ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सलग पाच तास चाललेल्या या प्रक्रियेत मायक्रोस्कोपचा वापर करून केसासारख्या अतिशय बारीक रक्तवाहिन्या पुन्हा एकमेकांना जोडण्यात आल्या. रक्तवाहिन्यांसोबतच हाताच्या नसा आणि इतर मऊ उतींचीही दुरुस्ती करण्यात आली, जेणेकरून अंगठ्यामध्ये पुन्हा रक्ताभिसरण सुरू होईल.
advertisement
Pune News: लग्नाची एवढी घाई! खोटं वय सांगून आळंदीत उरकला विवाह, सासऱ्याचीच जावयाविरोधात पोलिसांत धाव
डॉक्टरांच्या या परिश्रमानंतर तुटलेला अंगठा यशस्वीपणे जोडला गेला असून तो आता जीवंत झाला आहे. अशा प्रकारच्या अपघातात तुटलेला अवयव सुरक्षितपणे आणि वेळेत रुग्णालयात पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे असते. दुचाकीची चेन साफ करताना इंजिन सुरू ठेवणे किती धोकादायक ठरू शकते, याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. राहुल जाधव यांच्यावर आता पुढील उपचार सुरू असून, फिजिओथेरपीनंतर त्यांच्या अंगठ्याची हालचाल पुन्हा सामान्य होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. वेळेवर मिळालेले उपचार आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान यांच्या संगमामुळे राहुल यांना त्यांचे बोट परत मिळाले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 7:09 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
दुचाकीची चेन साफ करताना अंगठाच तुटून खाली पडला; जोडण्यासाठी पुण्यातील डॉक्टरांचे 5 तास प्रयत्न, अन्...










