तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकणं विसरा! पुणे-मुंबई प्रवास आता दीड तासात, 15 हजार कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
साधारण १५ हजार कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी खर्च केला जाणार असून, काम सुरू झाल्यापासून पुढील तीन वर्षांत हा मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
पुणे : पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांमधील अंतर आता अधिक कमी होणार आहे. भविष्यात हा प्रवास केवळ काही मिनिटांचाच उरणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पुणे-मुंबई दरम्यान एका नवीन आणि अत्याधुनिक द्रुतगती महामार्गाची योजना आखली आहे. या प्रकल्पाच्या सविस्तर अहवालाला (डीपीआर) नुकतीच अधिकृत मंजुरी मिळाली आहे. येत्या सहा महिन्यांत या प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. साधारण १५ हजार कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी खर्च केला जाणार असून, काम सुरू झाल्यापासून पुढील तीन वर्षांत हा मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. ज्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी आणि अपघातांना सामोरे जावे लागते. सध्या या प्रवासासाठी साधारण अडीच ते तीन तास लागतात. परंतु दरडी कोसळणे किंवा अपघातामुळे प्रवाशांचे तासनतास वाया जातात. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नवीन मार्ग मुंबईतील अटल सेतूपासून (MTHL) सुरू होईल. पुढे तो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी बंदराला जोडला जाईल. सह्याद्रीच्या दुर्गम डोंगररांगांमधून बोगदे आणि आधुनिक पुलांच्या मदतीने हा महामार्ग पुण्यातील भोर तालुक्यातील शिवरे येथे येऊन संपेल. विशेष म्हणजे, हा मार्ग पुण्याच्या प्रस्तावित 'रिंगरोड'ला जोडला जाणार असल्याने पुणे शहरात न येता थेट सातारा, कोल्हापूर आणि बंगळूरच्या दिशेने प्रवास करणे शक्य होणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 11:20 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकणं विसरा! पुणे-मुंबई प्रवास आता दीड तासात, 15 हजार कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील











