निलेश घायवळ प्रकरणात मोठा ट्विस्ट, रविंद्र धंगेकरांचा पुण्यातील भाजपच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप, समीर पाटील कोण?

Last Updated:

Pune Politics : निलेश घायवळवर प्रकरणावर बोलताना रविंद्र धंगेकर यांनी (Ravindra Dangekar On Nilesh Ghaywal) जोरदार टीका केली असून समीर पाटील नावाच्या व्यक्तीचा फोटो देखील शेअर केला आहे.

Ravindra Dangekar Shows Evidence of Allegation Over Nilesh Ghaywal
Ravindra Dangekar Shows Evidence of Allegation Over Nilesh Ghaywal
Ravindra Dangekar On Nilesh Ghaywal : पुण्यातील कोथरूडमध्ये राडा घातल्यानंतर स्विझरलँडला पळालेल्या निलेश घायवळवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत असताना आता पुण्यातील राजकारण पेटताना पहायला मिळतंय. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गुन्हेगारी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांना निलेश घायवळवर प्रश्न विचारल्यावर पाटलांनी उत्तर न देता वाट धरल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. अशातच आता शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.

निलेश घायवळ समीर पाटीलच्या संपर्कात

चंद्रकांत पाटील सध्या आत्मचिंतन करत असतील. आत्मचिंतन केल्यानंतर ते घायवळबाबत बोलतील. निलेश घायवळ हा समीर पाटील याच्या संपर्कात होता. समीर पाटील मोक्यातला गुन्ह्याचा आरोपी आहे, असं म्हणत शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी चंद्रकात पाटील यांच्यावर थेट टीका केली आहे. समीर पाटील यांचा निलेश घायवळ यांच्यासोबतचा फोटो धंगेकरांनी दाखवला. त्यानंतर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. निलेश घायवळ संदर्भात पोलीस महासंचालक यांना या संदर्भात देखील पत्र लिहिलं आहे, असंही धंगेकर म्हणाले.
advertisement
advertisement

पुण्यावरचा गुन्हेगारीचा डाग पुसा

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना चांगला धडा शिकवावा. पुण्याला गुन्हेगारीचा डाग लागणार असले तर हा डाग पुसून काढला पाहिजे. जर ग्रह खात्याने ठरवलं तर आजपासून 15 दिवसात निलेश घायवळ टोळी महाराष्ट्रात दिसणार नाही. पुणे पोलिसांनी जसा आंदेकर टोळीवर बुलडोझर चालवला अन् तपास शेवटच्या टोकापर्यंत केला, त्याचप्रमाणे देखील याचा तपास झाला पाहिजे. पोलीस खात्यातून दबका आवाज आहे हा माणूस आम्हाला त्रास देतोय, असं म्हणत धंगेकरांनी मोठा मुद्दा उपस्थित केलाय.
advertisement

समीर पाटील कोण?

दरम्यान, समीर पाटील कोण तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे लुडबुड करणारा आहे. दादाकडून गुन्हेगारी क्षेत्रात काही लोकांना मदत करणारा, पोलिसांना त्रास देणारा आहे, असा आरोप रविंद्र धंगेकरांनी केला आहे. कोथरूडमधील गुन्हेगारी, निलेश घायवळ प्रकरणी, पासपोर्टची छेडछाड, सरकारी कागदांमध्ये छेडछाड करण्याचं काम समीर पाटील करतो, असं रविंद्र धंगेकरांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या/पुणे/
निलेश घायवळ प्रकरणात मोठा ट्विस्ट, रविंद्र धंगेकरांचा पुण्यातील भाजपच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप, समीर पाटील कोण?
Next Article
advertisement
Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement