Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठीच्या 807 एकर जागेवर लवकरच प्रशासनाचा ताबा, 5 गावांसाठी प्रशासनाने उचललं मोठं पाऊल!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Purandar Airport Land acquisition : जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे की, विमानतळासाठी आवश्यक असलेली एकूण 3000 एकर जमीन संपादित करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे.
Pune Purandar Airport Land acquisition : पुणे येथील प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून वेगाने सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी संमतीपत्रे दिली आहेत, त्यांच्या जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. आतापर्यंत मुंजवडी, उदाची वाडी आणि एकेतपूर या तीन गावांमध्ये मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. या तीन गावांची सुमारे 807 एकर जागा लवकरच जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
807 एकर जागावर प्रशासनाचा ताबा
भूसंपादनाच्या या प्रक्रियेत पहिल्याच दिवशी सुमारे 50 हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे आता प्रशासनाने आता कामाचा वेग आणखी वाढवला आहे. जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे की, विमानतळासाठी आवश्यक असलेली एकूण 3000 एकर जमीन संपादित करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. येत्या शनिवारपासून आणखी दोन महत्त्वाची गावे, कुंभारवळ आणि खानावळ, येथे मोजणी सुरू करण्यात येणार आहे.
advertisement
स्वतंत्र पथकांची स्थापना
संमती दिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यास प्राधान्य दिल्याने, पुरंदर विमानतळाच्या पुढील कामाला गती मिळण्याची चिन्हे आहेत. यासाठी काही दिवसांपूर्वी जमिनीची मोजणी करण्यासाठी प्रारंभी जिल्हा प्रशासनाकडून पाच स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया वेगाने व्हावी, यासाठी आणखी एक पथक स्थापन करण्यात आले आहे.
advertisement
95 टक्के जागा ताब्यात येणार?
महसूल खातं, वन खातं, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुरंदर उपसा सिंचन योजनेतील अधिकाऱ्यांचा या पथकामध्ये समावेश आहे. संमतिपत्रे देण्याच्या कालावधीत 3 हजार 220 शेतकऱ्यांनी 2 हजार 810 एकर जागेचे संपादन करण्यासंदर्भातील संमतिपत्रे सादर केली आहेत. त्यानुसार 95 टक्के जागा ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 07, 2025 10:04 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठीच्या 807 एकर जागेवर लवकरच प्रशासनाचा ताबा, 5 गावांसाठी प्रशासनाने उचललं मोठं पाऊल!