advertisement

Pune Bandh: पुणे सलग दोन दिवस बंद! मनपा आयुक्तांचा मोठा निर्णय, शहरात शुकशुकाट

Last Updated:

या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिका आयुक्तांनी पुणे शहर आज आणि उद्या असे सलग दोन दिवस बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

पुणे सलग दोन दिवस बंद (फाईल फोटो)
पुणे सलग दोन दिवस बंद (फाईल फोटो)
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे सुपुत्र अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात दादांच्या निधनाची पुष्टी झाल्यानंतर, पुणे शहर आणि जिल्ह्यात तीव्र शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिका आयुक्तांनी पुणे शहर आज आणि उद्या असे सलग दोन दिवस बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे आणि बारामतीमध्ये व्यवहार बंद
महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहतील. आशिया खंडातील महत्त्वाची बाजारपेठ असलेले पुणे मार्केट यार्ड देखील दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी असोसिएशनने दिली आहे. दादांचे होमग्राऊंड असलेल्या बारामतीमध्येही व्यापाऱ्यांनी स्वतःहून कडकडीत बंद पाळला असून, संपूर्ण तालुक्यात शुकशुकाट पसरला आहे.
advertisement
अपघाताचे प्राथमिक कारण आणि परिस्थिती
आज सकाळी बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा करुण अंत झाला. या घटनेनंतर बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर समर्थकांची आणि सामान्य नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे.
advertisement
प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पुण्याचे पालकमंत्री म्हणून दादांनी शहराच्या विकासात दिलेले योगदान लक्षात घेता, पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Bandh: पुणे सलग दोन दिवस बंद! मनपा आयुक्तांचा मोठा निर्णय, शहरात शुकशुकाट
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement