धंगेकराची तलवारबाजी सुरूच, आरोपांनी अण्णा घायाळ; मोठ्या आंदोलनाची घोषणा

Last Updated:

माजी आमदार रवींद्र धंगेकर करणार जैन बोर्डिंग प्रकरणी बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे.

News18
News18
पुणे :  केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात नवनवीन आरोप करत आहेत. दरम्यान हे प्रकरण चांगलेच तापल्यानंतर आता माजी आमदार रवींद्र धंगेकर करणार जैन बोर्डिंग प्रकरणी बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे.
रवींद्र धंगेकर हे दरदिवशी आरोपांच्या फैरी डागत असतानाच मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी रात्री वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. धंगेकरांनी केलेल्या आरोपानंतर या भेटीला महत्व प्राप्त झालं होतं. या भेटीनंतर धंगेकरांनी मोहोळाविरोधात आघाडी कायम ठेवली आहे. दुसरीकडे मंत्री मोहोळांनी धंगेकरांचे सर्व आरोप फेटाळत होते. पुराव्यांशिवाय सिद्ध करतो की यात माझा काहीही सहभाग नाही असं त्यांनी म्हटलं होतं
advertisement
रवींद्र धंगेकर २७ ऑक्टोबर ला म्हणजेच सोमवार पासून जैन बोर्डिंग प्रकरणी व्यवहार रद्द होईपर्यंत धरणे आंदोलन करणार आहेत. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून जैन बोर्डिंग हॉस्टल च्या आवारात करणार बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे.

नेमकं काय म्हणाले धंगेकर?
तमाम पुणेकरांना मी एका गोष्टीची माहिती देऊ इच्छितो, आज आपल्या सर्वांच्या वतीने मी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा व प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी, यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करत आहे.तसेच २७ ऑक्टोबर २०२५ पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत मी तमाम पुणेकरांसह जैन बोर्डींग येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसत आहे.
advertisement
आजपर्यंतच्या गेल्या अठरा दिवसांच्या संपूर्ण संघर्षात माझ्यासह अनेक लोकांनी, अनेक वेळा या गोष्टीचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष पुरावे दिले की, व्यवहारातील सर्वच व्यक्ती व संस्था या श्री.मुरलीधर मोहोळ यांच्या संबंधित आहेत. आज मी या पत्र्यामध्ये देखील आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम देत आहेत.
जैन बोर्डिंग चा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरे व देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणाची निपक्ष:पाती चौकशी होणे गरजेचे आहे. ही मी निपक्ष:पाती चौकशी तेव्हा शक्य आहे जेव्हा सदर प्रकरणातील मुरलीधर मोहोळ हे आपल्या पदाचा राजीनामा देतील. कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रभावाखालीच हा इतका मोठा गैरव्यवहार घडला आहे. त्यामुळे ही चौकशी होत असताना देखील त्यांनी मंत्रीपदावर राहणे योग्य नाही.त्यामुळे मी आज मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.
advertisement
आज माननीय पंतप्रधानांसह ,देशाचे गृह तथा सहकारमंत्री, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना देखील आपण या पत्राच्या प्रती पाठवत आहोत.त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने हा व्यवहार आपल्या विशेष अधिकारातून रद्द करावा व या प्रकरणाची कठोर चौकशी होईपर्यंत मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा ,अशी मागणी मी करत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
धंगेकराची तलवारबाजी सुरूच, आरोपांनी अण्णा घायाळ; मोठ्या आंदोलनाची घोषणा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement