फलटण डॉक्टर प्रकरणातील आरोपील 4 दिवसांची कोठडी, चौकशीत कारण उघड होणार?

Last Updated:

आत्महत्येपूर्वी डॉक्टरनं तिच्या हातावर लिहून ठेवलेल्या मजकुरामुळे आरोपींची नावं निष्पन्न झाली होती.

News18
News18
सातारा:  महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. आरोपी प्रशांत बनकरला फलटणमधूनच अटक करण्यात आली. महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याच्यावर छळाचा आरोप केला होता. तर प्रशांतच्या कुटुंबीयांनी सर्व आरोप फेटाळलेत.
आरोपी प्रशांत बनकरला मोठ्या बंदोबस्तात कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं सुनावणीत आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.आरोपी प्रशांत बनकर याच्यावर आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने गंभीर आरोप केलेत. आत्महत्येपूर्वी डॉक्टरनं तिच्या हातावर लिहून ठेवलेल्या मजकुरामुळे आरोपींची नावं निष्पन्न झाली होती.

डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये काय लिहलं होत?

माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला.
advertisement

बनकरच्या कुटुंबियांनी आरोप फेटाळले

महिला डॉक्टरची आत्महत्या गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघड झाली होती. तर आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबीयांनी त्याच्यावरील सर्व आरोप खोडून काढले. प्रशांत बनकर हा निर्दोष असून महिला डॉक्टरच त्याला सतत त्रास देत होती असा आरोप त्याच्या बहिणीने केला. प्रशांतच्या भावानंही या प्रकरणात मोठा मुद्दा समोर आणलाय. माझा भाऊ पुण्याला असतो तो खूप कमी वेळा घरी येतो, याकडे प्रशांतच्या भावाने लक्ष वेधलं.
advertisement

बनकरच्या चौकशीत काय समोर येणार? 

महिला डॉक्टर राहत असलेल्या रूमला पोलिसांनी सील केलंय. तिच्या रूममधून काय मिळतं तसंच मोबाईल आणि सीडीआरमधून काय खुलासा होतो, यातून पुढील तपासाला दिशा मिळणार आहे. तसंच आरोपी प्रशांत बनकरच्या चौकशीतून मिळणारी माहिती या प्रकरणाची उकल करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
डॉक्टरच्या आत्महत्येनं अनेक सवाल उपस्थित
फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं अनेक सवाल उपस्थित झाले आहे. डॉक्टरनं केलेला दावा जर खरा असेल, तर  पोलीस आणि आरोग्य यंत्रणेनं मयत डॉक्टरच्या तक्रारींची दखल का घेतली नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.. महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं कोडं सुटण्यासाठी या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे.. त्यामुळं आता महिला डॉक्टरचा बळी गेल्यानंतर तरी पोलीस आणि प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देतील, ही अपेक्षा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फलटण डॉक्टर प्रकरणातील आरोपील 4 दिवसांची कोठडी, चौकशीत कारण उघड होणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement