वेशाव्यवसाय करणाऱ्या महिलांनी साजरी केली दिवाळी, पुण्यातील 'एक दिवा अस्तित्वाचा' उपक्रम काय, VIDEO

Last Updated:

diwali in red light area pune - समाजसेविका अलका गुजनाळ यांनी एक दिवा अस्तित्त्वाचा हा उपक्रम राबवला. त्यांनी येथील महिला व मुलांना दिवाळी निमित्ताने फराळ तसेच कपड्याच वाटप केले. पुणे शहरातील रेड लाईट एरिया मानल्या जाणाऱ्या बुधवार पेठेत मागील 5 वर्षांपासून त्या हा उपक्रम राबवत आहेत.

+
एक

एक दिवा अस्तित्वाचा उपक्रम

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : प्रत्येकजण वर्षभर दिवाळीची वाट बघततो. वर्षातील सगळ्यात मोठा सण म्हणून हा सण साजरा केला जातो. पण प्रत्येकाची दिवाळी साजरी करण्याची पद्धत ही मात्र वेगवेगळी असते. पुण्यातील बुधवार पेठ हा भाग रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. आपले गाव तसेच राज्यापासून दूर याठिकाणी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला राहतात. याच महिलांची दिवाळी गोड व्हावी म्हणून एक दिवा अस्तित्वाचा हा उपक्रम राबवण्यात आला. याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा आढावा.
advertisement
समाजसेविका अलका गुजनाळ यांनी एक दिवा अस्तित्त्वाचा हा उपक्रम राबवला. त्यांनी येथील महिला व मुलांना दिवाळी निमित्ताने फराळ तसेच कपड्याच वाटप केले. पुणे शहरातील रेड लाईट एरिया मानल्या जाणाऱ्या बुधवार पेठेत मागील 5 वर्षांपासून त्या हा उपक्रम राबवत आहेत.
सततची चिंता अन् डिप्रेशन, या सर्व त्रासावर सोपा उपाय काय, डॉक्टरांनीच दिला महत्त्वाचा सल्ला
यंदाही या भागातील महिला आणि त्यांच्या मुलांसाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लोकांनी पुढे येत त्यांना भेटवस्तू द्याव्या, फराळ वाटप करावे, हा हेतू लक्षात घेत हा उपक्रम राबवला जातो. समाजातील अशा वंचित घटकातील महिलांसाठी पुढे येत त्यांना एक हात मदतीचा देत त्यांच्यासाठी काम केले पाहिजे, या भावनेतून यंदा जवळपास 120 मुलांना स्वेटर, शूज आणि फराळ वाटप करण्यात आला. त्याचप्रमाणे महिलांनाही साड्या आणि फराळ वाटप करण्यात आले.
advertisement
या वंचित घटकातील महिलांनी पुढे यावे, आपण ज्याप्रमाणे आपली घरी दिवाळी साजरी करतो, तसे त्यांचीही दिवाळी साजरी करण्यासाठी अनेकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन करत आता अनेक संस्था या पुढे येत मदतीचा हात देत आहेत, अशी माहितीही समाजसेविका अलका गुजनाळ यांनी यावेळी दिली. दरम्यान, या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
मराठी बातम्या/पुणे/
वेशाव्यवसाय करणाऱ्या महिलांनी साजरी केली दिवाळी, पुण्यातील 'एक दिवा अस्तित्वाचा' उपक्रम काय, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement