Shocking News : भोंदू बाबा निघाला शातीर! शाल टाकली अन् महिलेचा लाखोंचा ऐवज केला लंपास; नेमकं काय घडल?

Last Updated:

Vakad Shocking News : वाकड परिसरात दोन खोट भविष्यवाणारे चोरट्यांनी महिलेकडून 7 लाख 72 हजार रुपयांचे दागिने आणि मोबाईल चोरी केला.

News18
News18
पिंपरी : वाकड परिसरात एका महिलेसोबत धक्कादायक घडली झाली आहे. दोन चोरट्यांनी घरातील अडचणी सोडवून देण्याचे आमिष दाखवून, शाल पांघरून भविष्य सांगण्याचा बहाणा केला. मग काय यानंतर त्यांनी महिलेचे दागिने आणि मोबाईल फोन लंपास केला आणि तेथून पळ काढला. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
महिलेसोबत नेमके घडले काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,महिला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असताना डांगे चौक परिसरात अचानक दोन अज्ञात व्यक्ती समोर आले. या चोरट्यांपैकी एकाने स्वतःची ओळख अशी करून दिली की, ''माझ्या आयुष्यात आता 20 वर्षांनी मुलगा झाला आहे, मी वृद्ध लोकांच्या अंगावर शाल टाकून त्यांचे भविष्य सांगतो आणि घरातील अडचणीवर तोडगा काढतो'', या अशा नकली भविष्यवाण्याच्या बहाण्याने त्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवून ठेवले.
advertisement
डाव साधत केली चोरी
जसे महिला त्यांच्या बोलण्यात गुंतली होती, तसेच या दोघांनी चपळतेने तिच्या अंगावरील दागिने आणि महागडा मोबाईल फोन हातात घेवून पसार होण्याचे धाडस केले. महिलेकडून उघडकीस आलेल्या माहितीप्रमाणे, या दोघांनी मिळून एकूण 7 लाख 72 हजार रुपयांचे दागिने आणि मोबाईल ही चोरी केली आहे.
या घटनेने परिसरात दहशत पसरवली आहे.महिला या घटनेनंतर घाबरून गेली आणि तात्काळ वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. वाकड पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवला असून, दोन्ही अज्ञात चोरट्यांच्या शोधासाठी सखोल तपास सुरू केला आहे. या प्रकरणात पोलिस लोकांना विनंती करत आहेत की, अशा नकली भविष्यवाणी करणाऱ्यांकडे सावधगिरीने वागावे, अनोळखी लोकांकडे महागड्या दागिन्यांसह जाणे टाळावे आणि त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Shocking News : भोंदू बाबा निघाला शातीर! शाल टाकली अन् महिलेचा लाखोंचा ऐवज केला लंपास; नेमकं काय घडल?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement