अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई? 'बाईपण भारी देवा' नंतर सासू-सुनेचा धमाल ड्रामा; फोटोतील या दोघी कोण?

Last Updated:

Aag Aag Sunbai Kay Mhantay Sasubai : केदार शिंदे यांच्या नव्या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं असून सिनेमाची रिलीज डेटही सांगितली आहे.

News18
News18
'बाईपण भारी देवा'च्या तुफानी यशानंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहेत. महिलांच्या मनातल्या भावना, त्यांच्या नात्यांमधला विनोद आणि संवेदना पडद्यावर आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. 'अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?' या नव्याकोऱ्या सिनेमाची त्यांनी नुकतीच घोषणा केली आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं असून सिनेमाची रिलीज डेटही सांगितली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे आहेत तर सिनेमाची निर्मिती त्याच मुलगी सना शिंदे हिनं केली आहे.
समोर आलेल्या पोस्टरमध्ये सासू-सुनेची जोडी पाठमोरी दिसत आहे. आता सासू-सूनेच्या भूमिकेत कोण दिसेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. प्रत्येक घरात,कुटुंबात घडणारी सासू-सुनेच्या नात्याची मजेशीर केमिस्ट्री, हलकीशी चतुराई, जिव्हाळा आणि न संपणारी टोलेबाजी याचे गोड-तिखट चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे.
advertisement
नव्या सिनेमाविषयी बोलताना केदार शिंदे म्हणाले, "प्रत्येक घरात सासू-सुनेचं नातं वेगळ्या रंगात दिसतं. कधी हसू, कधी नोकझोक, कधी भांडण तर कधी काळजी आणि प्रेम. प्रत्येकाच्या कुटुंबातील ही दोन वेगळी व्यक्तिमत्त्वं, दोन विचार आणि दोन घर सांभाळणाऱ्या स्त्रियांचं सामर्थ्य या सिनेमात पाहायला मिळेल. तसेच हा सिनेमा माझ्या खूप जवळचा आहे, कारण या सिनेमाच्या निमित्ताने सनाने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे."
advertisement
झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाची निर्मिती सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. सिनेमाची स्टोरी आणि डायलॉग वैशाली नाईक व ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत.  पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण व संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 16 जानेवारी 2026 मध्ये रिलीज होणार आहे.
advertisement
या आधी केदार शिंदे यांचा झापुक झुपूक हा सिनेमा रिलीज झाला होता. रीलस्टार आणि बिग बॉस सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाणबरोबर त्यांनी हा सिनेमा केला होता. पण या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई? 'बाईपण भारी देवा' नंतर सासू-सुनेचा धमाल ड्रामा; फोटोतील या दोघी कोण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement