Ration Card: सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील साडेतीन लाख रेशनकार्ड रद्द, कारण काय?
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Pune: अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अहवालानुसार, अनेक शिधापत्रिका धारकांनी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून धान्य घेतलेलं नाही.
पुणे: राज्यातील शिधापत्रिकाधारकांना राज्य सरकारने मोठा दणका दिला आहे. मागील सहा महिन्यांपासून धान्य न घेणाऱ्या सुमारे 3 लाख 33 हजार शिधापत्रिकांवरील धान्यवाटप बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये मृत व्यक्तींच्या नावे असलेल्या शिधापत्रिका देखील मोठ्या प्रमाणात आढळल्याने सरकारने ही कडक पावलं उचलली आहेत. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीत असलेल्या नवीन गरजूंना धान्य पुरवठा करता येणार आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अहवालानुसार, अनेक शिधापत्रिका धारकांनी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून धान्य घेतलेलं नाही. त्यामुळे त्या अप्रचलित शिधापत्रिकांबाबत संशय निर्माण झाला होता. शिधापत्रिका पुन्हा तपासण्याचे आदेश दिले गेले होते. या तपासणीत मृत व्यक्ती, स्थलांतरित किंवा बनावट माहिती असलेल्या कार्डधारकांची नोंद आढळली.
राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शिधावाटप बंद करून त्या शिधापत्रिका निष्क्रिय केल्या आहेत. परिणामी, यामुळे प्रतीक्षा यादीत असलेल्या अनेक पात्र कुटुंबांना शिधापत्रिका उपलब्ध करता येतील आणि त्यांना नियमित धान्य मिळेल.
advertisement
शहरात आठ लाख 73 हजार शिधापत्रिकाधारक
view commentsशहरात एकूण 8 लाख 73 हजार शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. धान्य न नेणाऱ्या शिधापत्रिकांवरील धान्य बंद करून ते प्रतीक्षा यादीतील नागरिकांना वितरित करावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. रद्द केलेल्या शिधापत्रिकांमध्ये मृत शिधापत्रिकाधारकांचा देखील समावेश आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू दाखला काढल्यानंतर त्याची नोंद राज्यपातळीवर ठेवली जाते. त्यानुसार आता मृत व्यक्तींची नावे शिधापत्रिकांवरून हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 08, 2025 12:27 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ration Card: सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील साडेतीन लाख रेशनकार्ड रद्द, कारण काय?


