Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 25 ऑगस्टपर्यंत वाहतुकीत मोठे बदल, हा रस्ता बंद!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून 25 ऑगस्टपर्यंत प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पर्यायी मार्गांबाबत जाणून घेऊ.
पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नेहमी वर्दळ असणारा पुण्यातील शिवाजी रस्ता 25 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. भिडेवाडा स्मारकाच्या कामासाठी शिवाजी रस्त्यावरील बुधवार चौकातील वाहतूक रात्रीच्या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रात्री 10 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद राहील. या काळात शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना जंगली महाराज रस्ता-टिळक रस्त्यामार्गे स्वारगेटकडे जावे लागेल.
भिडेवाडा स्मारकाच्या कामात अडथळा येऊ नये, पुणे शहर वाहतूक विभागाने रात्रीची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहतूक बदलांना 2 ऑगस्टपासून मंजुरी देण्यात आली असून अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे वाहतूक सुरू आहे. काम सुरू होताच वाहतुकीतील बदल लागू करण्यात येणार आहेत. येत्या 25 ऑगस्टपर्यंत ही रात्रीची वाहतूक बंदी कायम राहील.
advertisement
पर्यायी मार्ग माहिती
view commentsबर्वे चौकातून स्वारगेट कडे जायचे असेल तर जंगली महाराज रोड,खंडुजीबाबा चौक,टिळक रस्ता मार्ग पुढे स्वारगेटला जावे. महापालिकेकडे जाणाऱ्यांनी झाशीची राणी चौकातून डाव्या बाजूकडे जावे. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, बिजली शॉपपासून उजवीकडे वळून श्रीकृष्ण टॉकीज – सिटी बोस्ट लक्ष्मी रस्त्यामार्गे जावे लागेल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 05, 2025 11:37 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 25 ऑगस्टपर्यंत वाहतुकीत मोठे बदल, हा रस्ता बंद!


