बांग्लादेशी घुसखोरांना दणका, ब्लॅकलिस्ट आणि रेशन कार्ड पडताळणीचे आदेश; सरकारचा नव्या सूचना जारी
- Published by:Prachi Amale
- Reported by:Tushar Rupanwar
Last Updated:
राज्य सरकारतर्फे गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी घुसखोरीच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. राज्यभरात बांगलादेशी घुसखोरांविरोधात राज्य सरकारने कारवाईचा वेग वाढवला असून घुसखोरी रोखण्यासाठी फडणवीस सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. बांगलादेशी राज्यात आल्यावर वास्तव्यासाठी विविध पुरावे, दस्तावेज सादर करताना बनावट कागदपत्रांचा वापर करतात. त्यामुळे बांगलादेशीची ब्लॅकलिस्ट तयार करा आणि रेशनकार्ड पडताळणी करण्याचे राज्य सरकारने निर्देश दिले आहे. तसेच नवीन शिधापत्रिकेसाठी नव्या मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारतर्फे गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी घुसखोरीच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. बांधकाम क्षेत्रातील मजुरांपासून ड्रायव्हर, वेटर अशा विविध क्षेत्रात बांगलादेशींची घुसखोरी वाढल्याचे दिसले आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने सूचना जारी केल्या आहेत.
काय आहेत सरकारच्या सूचना?
- बांगलादेशी बेकायदेशीर स्थलांतरितांच्या विषयावर अंतर्गत विचारमंथन सत्रांचे आयोजन करून उपाययोजनाचा अहवाल ATS कडे पाठवण्याचे निर्देश
- बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांची एक काळी यादी (Black List) तयार करावी, जेणेकरून त्यांना शासकीय कल्याण योजनांचा लाभ मिळणार नाही याची खात्री करता येईल
- दहशतवाद विरोधी पथक (ATS) कडून प्राप्त गुन्हा दाखल झालेल्या १,२७४ बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांच्या यादीतील व्यक्तींच्या नावावर कोणतेही अधिकृत दस्तऐवज जारी झाले आहेत का, याची खातरजमा करावी. जर असे दस्तऐवज आढळले, तर त्यांचे रद्दीकरण, निलंबन किंवा निष्क्रियता करण्याची आवश्यक कार्यवाही तात्काळ करावी व सदर आदेशाची प्रत दहशतवाद विरोधी पथकाकडे माहितीस्तव पाठवावी
- या व्यतिरिक्त उघडकीस येणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांची यादी तयार करून ती विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यासाठी या विभागाच्या संगणक कक्षाकडे पाठवावी. ज्यायोगे क्षेत्रिय कार्यालये / विभागीय कार्यालये यांना दक्षता घेता येईल.
- स्थानिक प्रतिनिधीचे शिफारशीवरून शिधापत्रिका वितरीत करण्यात येत असल्यास अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची किंवा राहण्याच्या ठिकाणाची कडक पडताळणी करावी
- वरील सर्व बाबींची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. सदर कार्यवाहीची त्रैमासिक प्रगती अहवाल सरकारकडे सादर करण्यात यावा
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 9:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बांग्लादेशी घुसखोरांना दणका, ब्लॅकलिस्ट आणि रेशन कार्ड पडताळणीचे आदेश; सरकारचा नव्या सूचना जारी


