Pune Metro: नोकरदारांच्या वेळेत बचत होणार, पुणेकरांच्या सेवेत आणखीन दोन नव्या मेट्रो मार्गिका; कसा असेल मार्ग

Last Updated:

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन मार्गिकांना मंजुरी देण्यात आली आहे. 

News18
News18
केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन मार्गिकांना मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी लाईन 2 अ वनाज- चांदणी चौक आणि लाईन 2 ब रामवाडी-वाघोली या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लाईन 4 (खराडी-हडपसर -स्वारगेट-खडकवासला) आणि लाईन 4 अ (नळस्टॉप - वारजे -माणिकबाग) यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पाला जवळपास खर्च 9,857,85 कोटी आहे. या दोन्ही कॉरिडॉरचे एकूण लांबी 31.636 किलोमीटर असेल. या संपूर्ण मार्गिकेवर 28 स्थानके असतील. ही नवी मेट्रो लाईन पुण्याच्या आयटी हब, औद्योगिक क्षेत्र, मोठ्या शैक्षणिक संस्था आणि दाट लोकवस्ती असलेल्या निवासी भागांना जोडतील. त्यामुळे सर्वांनाच त्या मेट्रोचा फायदा होणार आहे.
advertisement
खराडी आयटी पार्कपासून खडकवासल्याच्या पर्यटन क्षेत्रापर्यंत सोबतच हडपसरचा औद्योगिक क्षेत्रापासून हे मार्ग वारजेपर्यंत सर्व शहराच्या पूर्व दक्षिण आणि पश्चिम भागांना जोडतील. लाईन 4 आणि 4 अ स्वारगेट, खराडी बायपास आणि नळस्टॉप लाइन 2 येथे कार्यरत आणि मंजूर कार्यरत कॉरिडोरला देखील जोडले जातील. या मार्गामुळे सोलापूर रोड, मगरपट्टा रोड, सिंहगड रोड, कर्वे रोड आणि मुंबई बंगलोर महामार्ग यासारख्या सर्वात व्यस्त मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. मेट्रोमुळे पुण्यातील काही पर्यायी मार्गांनाही याचा फायदा होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: नोकरदारांच्या वेळेत बचत होणार, पुणेकरांच्या सेवेत आणखीन दोन नव्या मेट्रो मार्गिका; कसा असेल मार्ग
Next Article
advertisement
Supreme Court On Local Body Election : आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश...
आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व
  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

View All
advertisement