अमेरिकेत पुण्याहून फोनवरून पूजापाठ; त्यानंतर उच्चशिक्षित तरुणीसोबत घडलं ते धक्कादायक

Last Updated:

फिर्यादी तरुणी या अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी शिक्षण असताना आरोपीने फोनवरून अध्यात्माद्वारे पूजापाठ आणि जप करून फिर्यादी सह त्यांच्या घरातील अडचणी सोडवतो असे सांगितले.

News18
News18
पुणे : 21 वर्षीय तरुणी.. उच्चशिक्षित.. अमेरिकेच्या शिकागोत शिक्षण घेते.. मात्र ती एका भोंदू बाबाच्या नादी लागली आणि स्वतःचं लाखो रुपयाचं नुकसान करून बसली. हा प्रकार घडलाय पुण्यात.. डेक्कन परिसरातल्या नळ स्टॉप येथे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी या अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी शिक्षण असताना आरोपीने फोनवरून अध्यात्माद्वारे पूजापाठ आणि जप करून फिर्यादी सह त्यांच्या घरातील अडचणी सोडवतो असे सांगितले. यासाठी आरोपीने फिर्यादी कडून पैसे घेतले. पूजा झाल्यानंतर हे पैसे परत देतो असे आश्वासनही दिले. त्यानुसार आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 11 लाख 83 हजार रुपये घेतले.
advertisement
तरुणी भारतात आली तिथंही लुटलं 
याशिवाय फिर्यादी जेव्हा भारतात परत आल्या तेव्हा त्यांचे महागडे कपडे असतील बॅगही आरोपीने घेतली. फिर्यादीला पिंपरी चिंचवड परिसरात बोलावून त्यांचा सोन्याचा हार आणि सोन्याच्या बांगड्या असा 5 लाख 59 हजाराचा ऐवज त्यांच्याकडून काढून घेतला. याशिवाय रोख 2 लाख 82 हजार रुपये देखील काढून घेतले.
advertisement
नोव्हेंबर 2022 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला.
पैसे, दागिने परत देण्यास नकार 
दरम्यान या सर्व घटनेनंतर फिर्यादीने आरोपीकडे आजवर दिलेली रोख रक्कम आणि दागिने परत मागितले असता आरोपीने फिर्यादीचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादी त्यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली.
advertisement
आरोपी विरोधात गुन्हा 
डेक्कन पोलीस ठाण्यात याप्रकरणी कलम 406, 420 आणि 506 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ अभयकुमार आमळे (रा. 904, स्मृती आनंद विजय नगर काळेवाडी पिंपरी चिंचवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या/पुणे/
अमेरिकेत पुण्याहून फोनवरून पूजापाठ; त्यानंतर उच्चशिक्षित तरुणीसोबत घडलं ते धक्कादायक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement