लग्नात आला 'बिन बुलाए मेहमान'; 470 रुपयांचं जेवण बकाबका खाल्लं, आहेर पाहून नवरी बेशुद्ध
- Published by:Priya Lad
Last Updated:
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती लग्नाला न बोलावता पोहोचते आणि मेजवानीचा आनंद घेऊ लागते. तो प्रत्येक पदार्थाची किंमत सांगतो आणि खातो. मग शेवटी तो पाकिटात आहेर म्हणून काही पैसे ठेवतो आणि वधूला देतो.
नवी दिल्ली : लग्नाशी संबंधित अनेक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात एक बिन बुलाए मेहमान एका लग्नात पोहोचला आहे. तिथं त्याने जे केलं ते आश्चर्यकारक आहे.
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती लग्नाला न बोलावता पोहोचते आणि मेजवानीचा आनंद घेऊ लागते. तो प्रत्येक पदार्थाची किंमत सांगतो आणि खातो. मग शेवटी तो पाकिटात आहेर म्हणून काही पैसे ठेवतो आणि वधूला देतो.
मुलगा काय काय खातो?
इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की अचानक एक मुलगा लग्न समारंभात शिरला. तो नातेवाईकांशी हात जोडून थेट जेवायला जातो. तो प्लेट उचलतो आणि संपूर्ण थाळीची किंमत सांगतो, ज्यात रोट्या, पुलाव, भाजी, कोशिंबीर, डाळ, रायता इत्यादींचा समावेश आहे, 300 रुपये. यानंतर तो मंचुरियनची प्लेट उचलतो, त्याची किंमत 50 रुपये आहे असे सांगतो. त्यानंतर तो 20 रुपये किमतीचा गुलाब जामुन घेतो. यानंतर तो कॉफी आणि इतर गोष्टी घेतो, ज्याची किंमत तो स्वतः सांगतो, 100 रुपये. अशाप्रकारे हा बिन आमंत्रित पाहुणा एकाच वेळी 470 रुपयांचे खाद्यपदार्थ खातो.
advertisement
वधूला काय भेट देतो?
आता भेटवस्तू देण्याची पाळी येते. अशा परिस्थितीत ही व्यक्ती खिशातून 10 रुपये काढून एका पाकिटात भरून वधूला देते. पाकीट उघडल्यानंतर वधूलाही धक्का बसला असेल.
इथं पाहा व्हिडिओ
view commentsहा व्हिडिओ रोहित सिंह चौहान नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. मात्र, हा व्हिडीओ मनोरंजनासाठी बनवण्यात आल्याचे दिसत आहे, कारण या व्हिडिओमध्ये रोहित स्वत: दिसत आहे. त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या लग्नाला जाऊन त्याने हा व्हिडिओ बनवला असण्याची शक्यता आहे. पण हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला.
Location :
Delhi
First Published :
August 21, 2024 10:35 AM IST
मराठी बातम्या/Viral/
लग्नात आला 'बिन बुलाए मेहमान'; 470 रुपयांचं जेवण बकाबका खाल्लं, आहेर पाहून नवरी बेशुद्ध


