घराचा मुख्य दरवाजा नेमका कोणत्या दिशेला असावा; पुण्याच्या कुलदीप जोशींनी सांगितली नियमावली!
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
घर बांधताना घराच्या मुख्य दरवाज्याचे नियम कोणते? याविषयी अधिक माहिती पुण्यातील वास्तूतज्ज्ञ कुलदीप जोशी यांनी दिलीय.
पुणे, 19 ऑगस्ट : वास्तू आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींशी निगडीत असल्याने घर बांधकामापूर्वी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. समृद्धी, यश, शांती, चैतन्य यांचा प्रत्यक्ष संबंध वास्तूशी जोडला जात असल्याने वास्तूची निवड आणि बांधकाम करताना नियोजन आणि वास्तूशास्त्रातील मूलभूत नियमांचा आग्रह धरताना बहुतेकजण दिसतात. यामागे अंधश्रद्धेचा भाग नाही, तर घर बांधतच आहोत तर वास्तूचे काही नियम पाळल्यास काय हरकत आहे, असा सरळ विचार त्यामागे असतो. त्यामुळे घर बांधताना घराच्या मुख्य दरवाज्याचे नियम कोणते? याविषयीचं अधिक माहिती पुण्यातील वास्तूतज्ज्ञ कुलदीप जोशी यांनी दिलीय.
आपल्या स्वप्नातील घर वाकडे- तिकडे आणि अनियमित आकाराच्या प्लॉटवर बांधकाम केल्यास आर्थिक हानी किवा मतभेदात वाढ होण्याची शक्यता असते. मध्यभागी प्लॉट बसका असल्यास अनेक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पूर्व दिशेकडे तोंडवळा असणारे घर शुभ मानले जाते. स्वयंपाक घर मोकळे, हवेशीर असण्यासोबतच त्यांची दिशाही लक्षात घ्यावी, असं कुलदीप जोशी सांगतात.
advertisement
घराच्या मुख्य दरवाज्याचेही काही नियम?
1. घराच्या मुख्य दरवाज्यासमोर रस्ता नसावा. दरवाज्यासमोर रस्ता असल्यास आपल्या विकासात बाधा येते.
2. दरवाज्यासमोर मोठे झाड असल्याने घरातील मुले नेहमी आजारी पडतात.
3. दरवाज्यासमोर नेहमी पाणी वाहते ठेवल्याने नेहमी आर्थिक नुकसान होत असते.
advertisement
4. दरवाज्यासमोर मंदिर असेल तर घरात कधीच सुख नांदत नाही.
टाळं लावताच शत्रू कमकुवत होतात; 'हे' मंदिर इच्छापूर्तीसाठी आहे प्रसिद्ध
5. घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्तंभ (खांब) असतील तर त्या घरातील महिला नेहमी आजारी पडतात.
6. जमिनीच्या तुलनेत घराचा दरवाजा खोलगट भागात असेल तर घरातील मुख्य पुरुष व्यसनाधीन व नेहमी दु:खात बुडालेला असतो.
advertisement
7. घरासमोर रस्ता, मंदिर असेल तर घरासमोर अधिक जागा सोडल्याने दोष नाहीसे होतात.
8. घराचे मुख्य प्रवेशद्वार घरातील इतर दरवाजापेक्षा मोठे असावे, अशी माहिती कुलदीप जोशी यांनी दिली आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती तज्ज्ञांचं वैयक्तिक मत आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 19, 2023 9:07 AM IST
मराठी बातम्या/रिअल इस्टेट/
घराचा मुख्य दरवाजा नेमका कोणत्या दिशेला असावा; पुण्याच्या कुलदीप जोशींनी सांगितली नियमावली!