Nagpanchami 2023: नागपंचमीला करा या एका मंत्राचा जप; कुंडलीतील दोषांपासून होईल सुटका
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Nagpanchami 2023: या दिवशी नागपूजन घरोघरी मोठ्या उत्साहात केले जाते. पुरणाचे दिंड, लाह्या, दूध वाहून नागाच्या प्रतिमेची पूजा करतात. या दिवशी कापणे, चिरणे, वर्ज्य असते...
मुंबई, 18 ऑगस्ट : यंदा 21 ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण साजरा होत आहे. या दिवशी नाग देवताची पूजा करण्याची परंपरा आहे. नाग भगवान विष्णू आणि भगवान शंकर या दोघांनाही प्रिय आहे, असे मानले जाते. म्हणूनच त्यांची पूजा केल्याने श्री हरी आणि महादेव दोघेही प्रसन्न होतात. या दिवशी नागपूजन घरोघरी मोठ्या उत्साहात केले जाते. पुरणाचे दिंड, लाह्या, दूध वाहून नागाच्या प्रतिमेची पूजा करतात. या दिवशी कापणे, चिरणे, वर्ज्य असते.
हिंदू धर्मानुसार, श्रावण महिना पूर्णपणे भगवान शंकराला समर्पित आहे आणि नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. हा सण भगवान शिव आणि नाग देवता यांच्याशी संबंधित आहे आणि या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने व्यक्तीची सर्व पापांपासून मुक्ती तर होतेच, शिवाय भगवान शंकराचा आशीर्वादही प्राप्त होतो, असे मानले जाते.
advertisement
शेष नाग जमिनीचा आधार -
स्थानिक ज्योतिषाचार्य पं.उदय शंकर भट्ट यांनी सांगितले की, साप हे आपले दैवत आहे. त्यांनी सांगितले की, पुराणात जमिनीचा आधार शेष नाग असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ आपली पृथ्वी शेषनागावर विसावली आहे. म्हणूनच त्यांना खूश करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. साप भगवान शंकराच्या गळ्यात शोभतो आणि श्रावण महिना हा बाबा भोलेनाथांच्या पूजेसाठी विशेष महिना आहे, म्हणूनच प्राचीन काळापासून नागपंचमीच्या दिवशी लोक नागाला दूध अर्पण करतात.
advertisement
या मंत्राचा जप करा -
ते म्हणतात की, सापाची प्रवृत्ती विषारी आणि क्रोधी असते, त्याला शांत करण्यासाठी दूध दिले जाते. दुधाचा रंग पांढरा असून तो शांततेचे प्रतीक आहे. असं मानलं जातं की, हे मानसिक शांतीसाठी देखील केले जाते. ज्या लोकांना खूप राग येतो त्यांनी नागपंचमीच्या दिवशी भक्तीभावाने नागाला दूध अर्पण करून त्यांची पूजा करावी, त्यामुळे त्यांचे वर्तन शांत होते.
advertisement
त्यांनी सांगितले की, नागपंचमीच्या दिवशी नाग गायत्री मंत्राचा 'ॐ नवकुलाय विद्यमहे विषदंताय धीमहि तन्नो सर्प: प्रचोदयात्’ जप करावा. असे केल्याने कुंडलीतील दोषांपासून मुक्ती मिळते आणि जीवनातील संकटेही दूर होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
First Published :
August 18, 2023 2:20 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Nagpanchami 2023: नागपंचमीला करा या एका मंत्राचा जप; कुंडलीतील दोषांपासून होईल सुटका


