आज पितृपक्षाचा शेवटचा दिवस! पितरांना प्रसन्न करायचं आहे का? मग हे उपाय कराच
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Sarva Pitru Amavasya 2025 : हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक दिवसांपैकी एक म्हणजे पितृ अमावस्या. पितृ पक्षातील ही शेवटची अमावस्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतींना आदर देण्यासाठी साजरी केली जाते.
मुंबई : हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक दिवसांपैकी एक म्हणजे पितृ अमावस्या. या वर्षी हा दिवस आज २१ सप्टेंबर रोजी आहे. पितृ पक्षातील ही शेवटची अमावस्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतींना आदर देण्यासाठी साजरी केली जाते.
advertisement
हिंदू पंचांगानुसार, आश्विन महिन्यातील ही अमावस्या सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते. कारण या दिवशी जे लोक ठराविक तिथींना श्राद्ध करू शकले नाहीत, त्यांना या एका दिवशी सर्व पूर्वजांचे श्राद्ध करण्याची परवानगी असते. त्यामुळेच याला “सर्वपित्री” असे म्हटले जाते.
धार्मिक महत्त्व
advertisement
ज्योतिष आणि पुराणांनुसार, या दिवशी केलेले तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध विधी पूर्वजांना संतुष्ट करतात. पूर्वज प्रसन्न झाल्यास घरात सुख-समृद्धी वाढते, मुलांच्या प्रगतीला चालना मिळते, आरोग्य सुधारते आणि कुटुंबातील अडथळे दूर होतात.
सर्वपित्री अमावस्येला गंगा, यमुना किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पूर्वजांना पाणी अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. जर पवित्र नदी जवळ उपलब्ध नसेल, तर घरच्या घरी शुद्ध पाण्यानेही जल अर्पण करता येते.
advertisement
अमावस्येला करावयाचे विशेष उपाय
आपल्या क्षमतेनुसार अन्न, कपडे, सोने किंवा गाय दान करावे.
श्राद्ध विधी करून ब्राह्मणांना भोजन द्यावे.
देवाचे जप व ध्यान केल्यास अतिरिक्त पुण्य प्राप्त होते.
पूर्वजांच्या पूजेच्या वेळी जमिनीवर स्वच्छ जागी सिंदूराने स्वस्तिक काढावे. त्यावर पाणी, सिंदूर आणि फुले अर्पण करावीत. मिठाई, दक्षिणा अर्पण करून पूर्वजांना नमस्कार करावा. शेवटी ब्राह्मण जोडप्याला आदराने भोजन घालून, तिलक लावून आणि दक्षिणा देऊन निरोप द्यावा.
advertisement
असे मानले जाते की या दिवशी अर्पण केलेले अन्न आणि दान सूर्यकिरणांद्वारे चंद्रलोकापर्यंत पोहोचते, जिथे पूर्वज राहतात. त्यामुळे अमावस्येला केलेल्या या विधींना विशेष महत्त्व दिले गेले आहे.
पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी
पितृ अमावस्या ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर आपल्या अस्तित्वाला मूळ असलेल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक पवित्र संधी आहे. त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबात सकारात्मकता आणि समाधान येते, असे मानले जाते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 12:19 PM IST