Ashadhi Wari 2025: घडो तुझी सेवा...! वारकरी सेवेसाठी 100 जणांची दुकानं बंद, तुम्हीही कराल कौतुक!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीला राज्यभरातून दिंड्या निघाल्या आहेत. या दिंडीतील वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा मानून अनेकजण जमेल ती सेवा करत आहेत.
सोलापूर: आषाढी वारीसाठी दिंड्या, पताका घेऊन लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. या वारकऱ्यांच्या सेवेलाच ईश्वरसेवा मानून हजारो भाविक जमेल ती सेवा देत असतात. सोलापुरातील सात रस्ता परिसरात उपलप मंगल कार्यालय येथे श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले. तेव्हा श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्था सोलापूर यांच्या वतीने वारकऱ्यांची मोफत दाढी-कटिंग करण्यात आली. जवळपास 2000 सालापासून ही परंपरा अखंडपणे चालत असून पुढेही चालू राहील, असे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार कांती यांनी सांगितले.
सोलापुरातील श्री संत सेना नाभिक दुकानदार संघाच्या वतीने 2000 सालापासून ही अखंड वारकरी सेवा सुरू आहे. संजयकुमार कांती व पांडुरंग चौधरी यांनी एका लिंबाच्या झाडाखाली बसून वारकऱ्यांच्या सेवेला सुरुवात केली होती. गेल्या 25 वर्षापासून नाभिक सेवा वारकऱ्यांची सेवा करत आहे. जवळपास 100 नाभिक आपले दुकाने बंद करून वारकऱ्यांची सेवा करत असतात. नाभिक बांधवांना पंढरीच्या वारीला जाणे शक्य नाही. विठ्ठलाच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करून एक वेगळे समाधान नाभिक बांधवांना मिळतो, असे कांती सांगतात.
advertisement
संत सेना महाराज यांन आम्ही आराध्य मानतो. ते उत्तर प्रदेशातील माधवगड येथे होते. पंढरीच्या वारीसाठी ते महाराष्ट्रात येत. तेव्हा ते वारकऱ्यांची सेवा करायचे. त्यासाठी आम्ही देखील वारकऱ्यांची सेवा सुरू केली. श्री गजानन महाराज यांच्या दिंडीतील सर्व वारकऱ्यांची दाढी कटिंग मोफत केली जाते. तसेच त्यांच्या पायाची मालिश, कपडे धुणे, चप्पल, बूट पॉलिश संस्थेच्या वतीने केली जाते, असेही अभयकुमार कांती यांनी सांगितले.
advertisement
सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून मंडप, कटिंग करण्यासाठी लागणारे टेबल आणि खुर्च्या यांची देखील सोय करण्यात येते. महत्त्वाचं म्हणजे कुठेही वर्गणी न मागता अखंडपणे वारकऱ्यांची सेवा श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थेकडून करण्यात येते. तसेच उपलप मंगल कार्यालय समोर अनेक व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था आपले योगदान देत असतात. यंदाही वारीचा हाच उत्साह कायम आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 01, 2025 6:56 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadhi Wari 2025: घडो तुझी सेवा...! वारकरी सेवेसाठी 100 जणांची दुकानं बंद, तुम्हीही कराल कौतुक!