Buddha Purnima 2025 : बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ‘हे’ काम विसरलात तर जीवनभर राहील ग्रहदोषाचा त्रास, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Buddha Purnima 2025 : हिंदू धर्मामध्ये वैशाख पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा देखील म्हटले जाते.
नाशिक : हिंदू धर्मामध्ये वैशाख पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा देखील म्हटले जाते. यंदा 12 मे रोजी ही पौर्णिमा साजरी केली जाईल. वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा का म्हटले जाते? वैशाख पौर्णिमा कशी साजरी करावी? यावर्षीचा शुभ मुहूर्त काय आहे? याबद्दलचं नाशिक येथील महंत अनिकेत शास्त्री यांनी माहिती दिली आहे.
वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा का म्हटले जाते?
वैशाख महिन्याच्या पौर्णिमा तिथीला विष्णूंचा नववा अवतार मानल्या जाणाऱ्या गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच पौर्णिमेला गौतम बुद्धांनी ज्ञानवृक्षाखाली बसून ज्ञान बुद्धत्वाची प्राप्ती केली होती, हा दिवस ध्यान, तपश्चर्येचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे वैशाख पौर्णिमेलाच बुद्ध पौर्णिमा या नावानेही ओळखले जाते, असं अनिकेत शास्त्री सांगतात.
advertisement
या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. धर्म शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने ग्रहांचे अत्यंत शुभ परिणाम आपल्याला मिळत असतात. तसेच लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी आपल्यावर अखंडपणे लाभते, असे महंत अनिकेत शास्त्री यांनी सांगितले.
advertisement
वैशाख पौर्णिमा कशी साजरी करावी?
पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. रोज केल्याने देखील हे अतिशय लाभदायी असते. या मुळे सकारात्मक ऊर्जा तसेच राहू केतू यांच्या अशुभ परिणाम आपल्याला जाणवत नाही. तसेच कुणाला राहू आणि केतूचे प्रभाव जाणवत असतील तर पिंपळाचे झाड आपल्या आजूबाजूला लावावे, असं महंत अनिकेत शास्त्री यांनी सांगितले.
advertisement
वैशाख पौर्णिमेचा शुभ मुहूर्त
वैशाख पौर्णिमेची तिथी 11 मे रोजी रात्री 8 वाजून 2 मिनिटांनी सुरू होणार असून 12 मे रोजी रात्री 10 वाजून 24 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार 12 मे रोजी पौर्णिमेचे व्रत, पूजा, उपासना केली जाईल.
advertisement
बौद्ध पौर्णिमेला बुद्धाचा हा मंत्र जास्तीत जास्त जप करावा
आयु: प्रजां धनं धान्यं सौभाग्यं सर्वसम्पदम्।
देहि देव महावृक्ष त्वामहं शरणं गत:।।
या मंत्राचा जप केल्याने आपल्याला अनेक फायदे हे जाणवणार असल्याचे अनिकेत शास्त्री यांनी सांगितले.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
May 10, 2025 10:54 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Buddha Purnima 2025 : बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ‘हे’ काम विसरलात तर जीवनभर राहील ग्रहदोषाचा त्रास, Video