Gauri Ganpati: आली गौराई...! तब्बल 109 वर्षांची परंपरा, ठाण्यातील या गौरी पाहण्यासाठी होतेय गर्दी

Last Updated:

Gauri Ganpati 2025: ठाण्यातील साळेकर कुटुंबाच्या गौराईंना तब्बल 109 वर्षांचा इतिहास आहे. यंदा देखील त्यांनी ही परंपरा जपली आहे.

+
गौराई 

गौराई 

ठाणे: गणेशोत्सव म्हटला की महाराष्ट्रात घराघरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. बाप्पाच्या आगमनानंतर काही दिवसांनी येणारे गौराई पूजन हे देखील या उत्सवाचे महत्त्वाचे आकर्षण असते. घराघरात गौराई येते आणि संपूर्ण घरात पुन्हा एकदा मंगलमय वातावरणाची अनुभूती मिळते. अशाच परंपरेचा वारसा जपणारे ठाणे पूर्व येथील साळेकर कुटूंब यंदा चर्चेत आले आहे, कारण त्यांच्या घरी येणाऱ्या गौराईला तब्बल 109 वर्षांचा इतिहास आहे.
साळेकर कुटुंबीयांच्या मते, त्यांच्या घरी गणपती बसवण्याची परंपरा आहेच, पण गौराई पूजनाचा सण हा खास असतो. यंदा गौराईचे आगमन अतिशय उत्साहात झाले असून, या गौराईचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा चेहरा अगदी जिवंत वाटावा असा हुबेहुब बाईसारखा आहे. त्यावर केलेली सजावट ही अजूनही परंपरेशी नातं सांगते. गौराईला सजवण्यासाठी खऱ्या सोन्याचा साज चढवला जातो, जे या परंपरेचे वैशिष्ट्य ठरते. पारंपरिक नथ, झुंबरे, कर्णफुले, मोत्यांच्या माळा अशा दागिन्यांनी गौराईची शोभा अधिकच खुलते.
advertisement
साळेकर कुटुंबात ही परंपरा आजोबांच्या काळापासून सुरू आहे. सुरुवातीच्या काळात गौरीची पूजा अतिशय साधेपणाने व्हायची, पण हळूहळू सोन्याचे दागिने, सुंदर साड्या आणि आकर्षक फुलांच्या आरासीत सजवण्याची प्रथा सुरू झाली. तरीही, जरी सोन्याची सजावट केली जात असली तरी मूळ परंपरा बदलली नाही. सर्व महिला मिळून गौराईच्या पूजेत आणि सजावटीत सहभागी होतात, जे कौटुंबिक एकोप्याचे प्रतीक मानले जाते.
advertisement
गौराई पूजनासाठी खास पदार्थही तयार केले जातात. तांदळाचे लाडू, पुरणपोळी, करंजी, मोदक आणि इतर पारंपरिक पदार्थांची रेलचेल असते. हे सर्व पदार्थ घरच्या घरीच केले जातात . या पूजेच्या वेळी घरात एक वेगळाच उत्साह अनुभवायला मिळतो. गीत, भजन, पारंपरिक आरत्या यामुळे वातावरण भक्तिमय बनते. त्या सोबतच पारंपरिक खेळ देखील खेळले जातात.
advertisement
गौराई पूजेच्या दिवशी साळेकर कुटुंबात नातेवाईक, मित्रपरिवार आणि शेजारी यांचीही मोठी गर्दी असते. लोक दूरदूरहून ही ऐतिहासिक गौराई पाहण्यासाठी येतात. तिचा सोन्याचा साज, नाजूक सजावट आणि सांस्कृतिक जपणूक हे सर्व पाहून प्रत्येकाला या परंपरेचा अभिमान वाटतो.109 वर्षांची ही गौराई पूजनाची परंपरा केवळ साळेकर कुटुंबाचा नाही, तर ठाणेकरांसाठीही अभिमानाचा विषय ठरते.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Gauri Ganpati: आली गौराई...! तब्बल 109 वर्षांची परंपरा, ठाण्यातील या गौरी पाहण्यासाठी होतेय गर्दी
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement