Kalashtami 2026: रोग, भय अन् असंख्य अडचणी दूर; शनिवारी कालाष्टमीला शिवरौद्ररुप काळभैरवाची करा पूजा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Kalashtami 2026: कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवाची उपासना करण्याला जास्त महत्त्व दिलं जातं. काळभैरवाची पूजा केल्याने आयुष्यातील अडचणी दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि आजार, भीती तसेच अडचणींपासून मुक्ती मिळते, असं मानलं जातं.
मुंबई : 2026 सालातील पहिली मासिक कालाष्टमी शनिवार, 10 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी पाळली जाते. या दिवशी भगवान शंकरांच्या उग्र स्वरूपाची म्हणजेच काळभैरवाची विशेष पूजा केली जाते. भैरवाचे दोन रूप मानले जातात – काळभैरव आणि बटुक भैरव. त्यापैकी कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवाची उपासना करण्याला जास्त महत्त्व दिलं जातं. काळभैरवाची पूजा केल्याने आयुष्यातील अडचणी दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि आजार, भीती तसेच अडचणींपासून मुक्ती मिळते, असं मानलं जातं.
कालाष्टमी 2026 पूजेचा शुभ वेळ -
पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी 10 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजून 24 मिनिटांनी सुरू होईल आणि 11 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांपर्यंत राहील. कालाष्टमीची पूजा निशिता काळात म्हणजेच मध्यरात्री करणे अधिक फलदायी मानले जाते. त्यामुळे या व्रतासाठी उदयतिथी पाहिली जात नाही. 10 जानेवारीच्या रात्री 11 वाजून 55 मिनिटांपासून ते 12 वाजून 46 मिनिटांपर्यंत काळभैरवाची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं.
advertisement
कालाष्टमीची पूजा कशी करावी -
कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालावेत. घरातल्या पूजास्थानाची स्वच्छता करून तिथे भगवान काळभैरवांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. त्यानंतर व्रताचा संकल्प करून ॐ काळभैरवाय नमः या मंत्राचा जप करत पूजेला सुरुवात करावी. धूप, दीप लावून देवाला फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करावा.
advertisement
पूजा पूर्ण झाल्यानंतर काळभैरवांची आरती करावी. सकाळची पूजा झाल्यावर दिवसभर उपवास ठेवावा आणि मध्यरात्री पुन्हा एकदा काळभैरवाची पूजा करून उपवास सोडावा. या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी किंवा चपाती खाऊ घालणं फार शुभ मानलं जातं. असं केल्याने भगवान काळभैरवांचा विशेष आशीर्वाद मिळतो, असं मानलं जातं.
advertisement
काळभैरव पूजेचं महत्त्व - काळभैरव हे भगवान शंकरांचं रक्षक स्वरूप मानलं जातं. ते काळाचे, भयाचे आणि नकारात्मक शक्तींचे स्वामी आहेत. काळभैरवाची पूजा केल्याने अकस्मात संकटं, अपघाताची भीती, शत्रूचा त्रास, कोर्ट-कचेरीचे प्रश्न आणि मानसिक अस्वस्थता कमी होते असं मानलं जातं. ज्यांच्या आयुष्यात अडथळे वारंवार येतात, कामं अडकतात किंवा मन कायम अस्वस्थ राहतं, अशा लोकांसाठी काळभैरवाची उपासना फार उपयुक्त मानली जाते.
advertisement
काळभैरवाचे सोपे मंत्र -
ॐ कालभैरवाय नमः
हा मंत्र रोज किंवा कालाष्टमीच्या दिवशी किमान 108 वेळा जपावा. मन शांत होतं आणि भीती कमी होते.
ॐ भैरवाय नमः
हा छोटा मंत्र आहे. कामात अडथळे येत असतील तर हा मंत्र जपल्याने फायदा होतो.
ॐ ह्रीं बटुक भैरवाय नमः
हा मंत्र संरक्षणासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी जपला जातो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 3:48 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Kalashtami 2026: रोग, भय अन् असंख्य अडचणी दूर; शनिवारी कालाष्टमीला शिवरौद्ररुप काळभैरवाची करा पूजा








